घरताज्या घडामोडीManike Mange Hiteचं हिंदी वर्जन, श्रीलंकन गायिका योहानीची बॉलिवूडमध्ये एंट्री

Manike Mange Hiteचं हिंदी वर्जन, श्रीलंकन गायिका योहानीची बॉलिवूडमध्ये एंट्री

Subscribe

मणिके मागे हिते हे गाणे केवळ श्रीलंकेतच नाही संपूर्ण जगभरात ऐकले गेले

मणिके मागे हिते (Manike Mage Hithe ) या गाण्याने सोशल मीडियावर सर्वांना वेड लावणारी श्रीलंकन गायिका योहानी (Sri Lankan singer Yohani)  आता बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे.  गायिका योहानी भूषण कुमार इंदकर यांच्या थँक गॉड सिनेमात डेब्यू करणार आहे. खास वैशिष्ट्य म्हणजे सिनेमात योहानीचे मणिके मागे हिते या गाण्याचे हिंदी वर्जन प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. योहानीच्या आवाजात हे गाणे हिंदीमध्ये ऐकण्यासाठी प्रेक्षक उत्साही आहेत. या सिनेमात अभिनेता अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंह प्रमुख कलाकार असणार आहेत.

- Advertisement -

थँक गॉड हा एक हलका फुलका कॉमेडी सिनेमा असणार आहेत. केवळ कॉमेडी नाही तर त्यातून एक सामाजिक संदेश प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न सिनेमातून करण्यात येणार आहे. सिनेमात मणिके मागे हिते गाण्याचे देसी वर्जन ऐकायला मिळणार याकारणानेच सिनेमा चांगलाच चर्चेत आला आहे. योहानीचे हे हिंदी वर्जन प्रसिद्ध संगितकार तनिष्क कंपोज करणार आहे. तर रश्मी विरागने या मनिके मागे हितेच्या हिंदी वर्जनचे लिरिक्स लिहिले आहेत.

- Advertisement -

श्रीलंकन गायिका योहानीचे मणिके मागे हिते हे गाणे केवळ श्रीलंकेतच नाही संपूर्ण जगभरात ऐकले गेले. योहानीने गाण्याच्या भारतातील कोलाबोरेशन विषयी सांगताना म्हटले की, मला इथे खुप प्रेम आणि सपोर्ट मिळाला. भूषण कुमार आणि संपूर्ण टीमचे आभार जे या गाण्याचे हिंदी वर्जन प्रेक्षकांसाठी आणत आहेत.

योहानी तिच्या गाण्यामुळे रातोरात स्टार झाली. मणिके मागे हिते हे गाणे यू ट्यूबवर अनेक दिवस ट्रेडिंगमध्ये होते. अनेकांनी या गाण्याचे हिंदी वर्जन तसेच मराठी सह अनेक भाषांमध्ये आणण्याचा प्रयत्न केला मात्र योहानीच्या गाण्याला कुठेच तोड नाही. आता योहानीच्या या गाण्याचे हिंदी वर्जन कसे असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.


हेही वाचा – अनुष्काने शेअर केला वामिकाचा विराटसोबत खेळतानाचा फोटो, पहा कशी दिसतेय विरुष्काची लेक

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -