सडपातळ बांधा, रेखीव डोळे, वर्ण गोरा आणि ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने सर्वाना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे मनीषा कोईराला. अभिनेत्री मनीषा कोईरालाला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. 90 च्या दशकात एकापेक्षा एक दमदार सिनेमे करत तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. 1940 love story, सौदागर, बॉम्बे, दिल से, गुप्त, अकेले हम अकेले तूम, अग्निसाक्षी, मन, खामोशी असे तिचे गाजलेले चित्रपट…
मनीषा मुळची नेपाळची
मनीषा कोईरालाच जन्म 16 ऑगस्ट 1970 मध्ये नेपाळमधील काठमांडू येथे झाला आहे. मनीषाचे बाबा कॅबिनेट मंत्री होते. 1989मध्ये मनीषाने करिअरला सुरुवात केली. 1989मध्ये आलेला फेरी भेटौला हा तिचा पहिला चित्रपट होता. यानंतर 1971 मध्ये आलेला सौदागर या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर मनीषाने कधी मागे वळून पाहिले नाही. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटातून मनिषाने दमदार भूमिका साकारत आहेत.
मनिषाचं नाव त्याकाळी अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं जात होत. पण, तिने एका बिझनेसमॅनशी लग्नगाठ बांधली. संसार मात्र टिकला नाही. 2012 मध्ये बिझनेसमॅन सम्राट आणि मनिषाचा घटस्फोट झाला. मनीषा तिच्या खासगी लाइफबद्दल सहसा बोलत नाही. मात्र, नुकत्याच एका मुलाखतीत ती लाइफपार्टनरबद्दल बिनधास्तपणे बोलली आहे.
मुलाखतीत तिला आयुष्यात जोडीदार नसल्याने एकटेपणा जाणवतो का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ती हसत म्हणाली की, कोणी म्हटलंय माझ्याजवळ जोडीदार नाही? पुढे ती म्हणते की, या प्रश्नाचं उत्तर मी हो आणि नाही असं दोन्ही देईन. कारण जशी मी आहे आणि जसं माझं आयुष्य आहे तशी मी खूश आहे. ज्या क्लॉलिटीचे आयुष्य मी जगत आहे, ते मला सोडायचं नाही. जर एखादी व्यक्ती आणखी चांगल्या गोष्टी आणत असेल आणि सोबत चालायला तयार असेल तर मी खूश होईन. पण, सध्या माझ्याकडे जे आहे, ते मला बदलायचं नाही. त्यामुळे मी माझा जोडीदार शोधण्याचा फारसा प्रयत्न करत नाही. या आयुष्यातून मला स्वातंत्र, समाधान मिळत आहे.
कॅन्सरवर केली मात –
2012 मध्ये मनीषाला गर्भाशयाच्या कॅन्सरची लागण झाली होती. न्यूयॉर्कमध्ये तिने कॅन्सरवर उपचार करत त्यावर मातही केली होती. मनीषानं कॅन्सरवर मात करुन पुन्हा अभिनय क्षेत्रात कमबॅक केलं आणि हील्ड: हाउ कॅन्सर गेव मी ए न्यू लाइफ हे पुस्तक मनीषाने लॉंच केल. दरम्यान, आजही त्याच ताकदीने मनीषा दर्जेदार अभिनय करुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
हेही पाहा –