मुंबईत दैनंदिन जीवनात प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. केवळ सामान्य लोकांनाच नाहीतर बहुतांश सेलिब्रिटींना सुद्धा यामुळे त्रास होतो. अनेक कलाकार वाहतूक कोंडीबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करताना दिसतात. अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक तिला ही काही असाच अनुभव आलाय. याबाबत मंजिरीने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.
मंजिरी ओक रिक्षाने प्रवास करत असताना संबंधित चालक फोनवर रील्स बघत गाडी चालवत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. त्याला याबाबत दोनदा सांगूनही संबंधित चालकाने दुर्लक्ष केल्याने शेवटी तिला रिक्षा बदलावी लागली. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.
View this post on Instagram
“पैसे देऊन आणि वर आपला जीव मुठीत घेऊन, असा प्रवास का करायचा? आणि यावर यांना काही बोलायचं नाही. कारण, काही बोललं तर यांचीच अरेरावी ऐकून घ्यायला लागेल. दोनदा सांगूनही काही सुधारणा न झाल्यामुळे मी रिक्षा बदलली… आणि तरीही त्याला काही फरक पडला नाही. म्हणजे भाडं गेलं तरी चालेल समोरच्याचा आणि स्वतःचाही जीव धोक्यात घालीन पण, मी रिक्षा चालवताना असा फोन बघणारच. पूर्ण वेळ हा असाच रिक्षा चालवतो असं अत्यंत अभिमानानी सांगितलं त्यांनी मला… एकूणच कठीण आहे सगळं, देव त्याला अक्कल देवो.” अशी पोस्ट शेअर करत मंजिरीने आपला अनुभव सांगितला आहे. याशिवाय तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अभिनेत्रीने तक्रार करण्यासाठी संपर्क देखील नमूद केला आहे.
दरम्यान, मंजिरी ओकच्या पोस्टवर मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत आपली मतं मांडली आहेत.