‘Mann Udu Udu Zala’ फेम अजिंक्य राऊत इन्स्टाग्रामवरून गायब; नेमकं कारण काय?

Mann Udu Udu Zala fame ajinkya raut deactive instagram page hacked
'Mann Udu Udu Zala' फेम अजिंक्य राऊत इन्स्टाग्रामवरून गायब; नेमक कारण काय?

‘मन उडु उडु झालं’ (Mann Udu Udu Zala) या मालिकेने आजवर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले, या मालिकेतील इंद्रा आणि दीपा या जोडीला प्रेक्षकांचीही पसंती मिळाली. प्रेक्षकांना दोघांची केमिस्ट्री खूप आवडली. अभिनेता अजिंक्य राऊतने या मालिकेत इंद्राची भूमिका साकारली. अजिंक्य सोशल मीडियावर बराचं सक्रिय असतो. मात्र काही दिवसांपासून तो इन्स्टाग्रामवर दिसेनासा झाला आहे. त्यामागे कारणही तसंच आहे.

गेल्या दिवसांत कलाकरांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक होण्याचे प्रमाण वाढतेय. याचा फटका आता अजिंक्य राऊतला देखील बसला आहे. अजिंक्य राऊतचं (Ajinkya Raut) इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंट हॅक झाल्याच समोर आलं आहे. इन्स्टा अकाऊंट ‘व्हेरिफाय’ करण्यासाठी अजिंक्यला एक मेसेज आला होता. त्या मेसेजला रिप्लाय देताना अजिंक्यने चुकून युजरनेम आणि पासवर्ड सांगितला. यानंतर त्याचं अकाऊंट हॅक झाल. अकाऊंट हॅक झाल्याचं लक्षात येताच अजिंक्यने त्याचे पेज डिअक्टीव्ह केलं आहे.

इन्स्टाग्राम अकाऊंट ब्लूक टीक (व्हेरिफिकेशन) साठी त्याला फेक मेसेज आला होता. संबंधित मेसेज त्याला खरा वाटल्याने अजिंक्यने त्यावर क्लिक करत सर्व माहिती दिली. याप्रकरणी त्याने सायबर सेलकडे एफआयआर दाखल केली आहे. सध्या अजिंक्यचा इन्स्टाग्राम अकाऊंट बंदच आहे.

दरम्यान अजिंक्य राऊतने या घटनेला दुजोरा दिला आहे. मन उडू उडू झालं या मालिकेतील इंद्रजित साळगावकर या भूमिकेमुळे अजिंक्य तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. या मालिकेतील अभिनेत्री हृता दुर्गुळेसोबतची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडतेय. सध्या मालिकेत इंद्रा आणि दीपूच्या प्रेमाचा ट्रॅक सुरु आहे. मालिकेतील या जोडीच्या अनेक रिल्स सोशल मीडियावरही व्हायरल होत असून प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. दरम्यान अजिंक्यही त्याचे अनेक फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. पण आता त्याचे इन्स्टा अंकाऊट हॅक झाल्याने तो सोशल मीडियावरील काही दिवस दिसणार नाही आहे.


मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणानेच निवडणुका होणार, SCचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात काय होणार?