घरमनोरंजनकिंग खानच्या वाढदिवसासाठी सजतोय 'मन्नत'

किंग खानच्या वाढदिवसासाठी सजतोय ‘मन्नत’

Subscribe

बॉलीवूडच्या किंग खानच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. शाहरूखचा वांद्र्यातील मन्नत बंगला सध्या आकर्षक रोषणाईने सजत आहे.

बॉलीवूडचा बादशाह अर्थात किंग खान शाहरूख खान येत्या २ नोव्हेंबरला आपला ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरूखच्या वाढदिवसाला त्याचे चाहते मन्नतसमोर अक्षरशः ठाण मांडून बसतात. त्यामुळे यावर्षी शाहरुखच्या वाढदिवसाला काय खास असणार आहे याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांनी लागून राहिली आहे. दरम्यान शाहरूखच्या वाढदिवासाठी त्याचा मन्नत सजवला जात आहे. वाढदिवसाची जय्यत तयारी सुरु असून मन्नतचे अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

मन्नतवर आकर्षक रोषणाई

शाहरूख खान नेहमीच आपल्या वाढदिवसाला जंगी पार्टी देत असतो. यावर्षीदेखील अशाच जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं असणार असं शाहरूखचा बंगला मन्नतकडे बघून वाटत आहे. बंगला पूर्ण सजवण्यात आला असून अतिशय आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दरवर्षी शाहरूख आपल्या मन्नत बंगल्याच्या बाल्कनीमध्ये येऊन चाहत्यांसाठी काही काळ उभा राहून त्यांच्याकडून शुभेच्छा घेत असतो. मागच्या वर्षी शाहरूखने त्याच्या वाढदिवसाची पार्टी अलिबागच्या बंगल्यावर ठेवली होती. मात्र यावर्षी पुढच्याच महिन्यात त्याचा झिरो हा चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे कदाचित मुंबईतच आपल्या जवळच्या लोकांना शाहरूख मन्नतमध्ये पार्टी देणार असल्याचं सध्या म्हटलं जात आहे. तसंच एक खास कार्यक्रम आयोजित करून या पार्टीमध्येच ट्रेलरही लाँच करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

- Advertisement -

झिरो होणार डिसेंबरमध्ये प्रदर्शित

शाहरूखचा झिरो २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे शाहरूख आता त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होईल. या चित्रटात अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफही शाहरूखबरोबर प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -