घरमनोरंजनमनोज बाजपेयीला कोरोनाची लागण

मनोज बाजपेयीला कोरोनाची लागण

Subscribe

मनोज बाजपेयी याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेता मनोज बाजपेयी याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मनोज बाजपेयी यांचे कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना क्वारंटाइनही करण्यात आले आहे. मनोज बाजपेयी सध्या ‘डिसपॅच’ या चित्रपटाचे शूटिंग करत होते. मात्र आता त्यांना कोरोना झाल्यामुळे या चित्रपटाचे चित्रिकरण ही काही काळासाठी थांबविण्यात आलं आहे. मनोज यांच्या आधी ‘डिसपॅच’ चित्रपटाच्या दिग्दर्शक कानू बहल यांनाही कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे आता मनोज यांनाही या विषाणूची लागण झाल्याने सगळेच चिंतेत आहेत.

‘डिसपॅच’ हा चित्रपट गुन्हेगारी पत्रकारितेवर आधारित आहे. चित्रपटाला घेवून मनोज ही खूप उत्साहित होते. त्यांनी एका मुलाखतीत चित्रपटाच्या बद्दल माहिती देताना असे सांगितले होते की, मला प्रेक्षकांना सांगण्यासारख्या प्रत्येक कथेचा एक भाग व्हायचं आहे. डेस्पॅच ही एक अशी कहाणी आहे ज्यासह प्रत्येकजण संबंधित राहण्यास सक्षम असेल. कानू बहल यांच्यासोबत काम करायला मी फार उत्सुक आहे. अशा शब्दात त्यांनी चित्रपटाच्या चित्रिकरणाबाबतचे त्यांचे मत व्यक्त केले होते. यासंदर्भात चित्रपटाच्या टीमने निवेदन जारी करताना अभिनेताने लवकर बरे व्हावं अशी आशा केली आहे. मनोज बाजपेयी यांनी आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. ते नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांसाठी ओळखले जातात. अशा परिस्थितीत चाहते आता, मनोज बाजपेयी यांना लवकरात लवकर बरे वाटावे, यासाठी प्रार्थना करत आहेत.

- Advertisement -

हे वाचा- आदिपुरुषमध्ये क्रितीची एंट्री,दिसणार सीतेच्या भूमिकेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -