घरमनोरंजनमानुषी छिल्लर अक्षयकुमारच्या 'या' चित्रपटातून करणार पदार्पण

मानुषी छिल्लर अक्षयकुमारच्या ‘या’ चित्रपटातून करणार पदार्पण

Subscribe

अक्षय कुमारच्या पृथ्वीराज या चित्रपटात मानुषी संयोगिताची भूमिका साकारणार

२०१७ साली मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड ठरलेल्यानंतर नेहमीच अनेकांच्या चर्चेत आहे. मिस वर्ल्ड झाल्यानंतर मानुषीच्या बॉलिवूड विश्वातील पदार्पणाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता कन्फर्म झाले आहे की, मानुषी छिल्लर ही यशराज प्रोडेक्शनच्या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. अक्षय कुमारच्या पृथ्वीराज या चित्रपटात मानुषी संयोगिताची भूमिका साकारणार आहे. पृथ्वीराज हा चित्रपट राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारलेला आहे. पृथ्वीराज आणि संयोगिता यांची अमर प्रेम कहानी यामध्ये दाखवण्यात य़ेणार आहे.

- Advertisement -

संयोगिताच्या भूमिकेसाठी तरुण चेहऱ्याच्या तसेच भारतीय अभिनेत्रीच्या शोधात होतो. त्यासाठी ऑडिशन देखील घेण्यात आल्या. संयोगिता अविश्वसनीय आणि सुंदर होती. या भूमिकेशी मिळता-जुळता चेहऱ्याच्या शोधात होतो आणि मानुषी भेटली, असे पृथ्वीराज चित्रपटाचे दिग्दर्शक डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी सांगितले.

View this post on Instagram

??

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar) on

- Advertisement -

९ महिन्यांपासून संयोगितासाठी करतेय मेहनत

मानुषीने या भूमिकेसाठी अनेकदा ऑडिशन दिल्या होत्या. मानुषीला चित्रपटाची टीम या चित्रपटाच्या भूमिकेसाठी मागील नऊ महिन्यांपासून ट्रेनिंग देत आहे. ”यशराज फिल्म सारख्या प्रोडक्शन हाऊसने नायिका म्हणून निवड केली हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पृथ्वीराज सारख्या चित्रपटातून पदार्पण करताना मी बॉलिवूडमध्ये पहिला चित्रपट करतेय हे माझे भाग्यच आहे.”, असे मानुषी छिल्लरने सांगितले.


Video: सलमानच्या ‘हुड हुड दबंग’ टायटल ऑडिओ ट्रॅकनंतर व्हिडिओ रिलीज
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -