घरमनोरंजनफेसबुक पोस्ट करून मनवा नाईकने सांगितला धक्कादायक प्रकार

फेसबुक पोस्ट करून मनवा नाईकने सांगितला धक्कादायक प्रकार

Subscribe

मराठमोळी अभिनेत्री आणि निर्माती मनवा नाईकने आतापर्यंत मराठी टेलिव्हिजनवरील मालिका आणि अनेक मराठी चित्रपटांत काम केले आहे. सध्या मराठी मनोरंजन सृष्टीत मनवा नाईकला अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर एक निर्माती म्हणून देखील ओळखले जाते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटातही ती झळकली होती. या चित्रपटामध्ये मनवाने छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नीची सोयराबाई मोहिते ही भूमिका साकारली होती. तसेच सध्या मनवा मराठी टेलिव्हिजनवरील मालिकांची निर्मिती सुद्धा करत आहे. दरम्यान, नुकताच मनवा नाईकबाबत एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाबाबत तिने एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

मनवा नाईकने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मनवाने तिने एका गाडीचा नंबर आणि एका व्यक्तीचा फोटो फोटो शेअर केला आहे. शिवाय याखाली कॅप्शन देत तिने तिच्याबरोबर घडलेला प्रकार सांगितला आहे.

- Advertisement -

मनवाने शेअर केली पोस्ट

- Advertisement -

हा प्रसंग शेअर करायलाच हवा. मी रात्री 8.15 च्या सुमारास उबर केली. मी वांद्रे-कुर्ला परिसरात पोहोचल्यावर तो उबर चालक फोनवर बोलत होता. मी त्याला फोनवर बोलू नका असे सांगितले. पण त्याने माझं काहीही ऐकले नाही. त्यानंतर त्याने बीकेसीमधील एक सिग्नल तोडला. मी त्याला असे करु नको, असं पुन्हा एकदा सांगितलं. पण त्याने माझे काहीही ऐकले नाही. त्यानंतर पुढे गेल्यावर ट्राफिक पोलिसांनी त्याला अडवले. त्याचा फोटो क्लिक केला. पण त्या उबर चालकाने वाहतूक पोलिसांशी देखील वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर मी हस्तक्षेप केला. मी गाडीचा फोटो काढला आहे, त्यामुळे आता जाऊ द्या, असे मी पोलिसांना सांगितले.

पण त्यानंतर त्या उबर चालकाला भयंकर राग आला. त्याने तू 500 रुपये भरणार आहेस का? असं मला त्याने रागात विचारले. त्यावेळी मी म्हणाली, तू फोनवर बोलत होतास. त्यानंतर त्याने पुन्हा गाडी चालवण्यास सुरुवात केली आणि त्यावेळी त्याने मला धमक्या दिल्या. थांब तुला दाखवतो, अशा शब्दात त्याने मला धमकावले.

यानंतर मी त्याला गाडी पोलीस स्टेशनजवळ घे असे सांगितले. तर त्याने बीकेसीमधील जिओ गार्डन परिसरात गडद अंधार असलेल्या ठिकाणी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी पुन्हा गाडी पोलीस स्टेशनला घ्या, असे त्याला सांगत होते. तो संपूर्ण प्रवासात माझ्याशी वाद घालत होता आणि गाडीही भरधाव वेगाने चालवत होता. वांद्रे कुर्ला संकुलाच्या परिसरात असलेल्या कुर्ला पुलावर त्याने पुन्हा एकदा गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. थांब दाखवतोच आता, अशी धमकीही त्याने मला दिली. त्यानंतर मात्र मी उबर सेफ्टीला फोन केला. उबरमधील ग्राहक सेवा कर्मचाऱ्याबरोबर फोनवर बोलत असतानाही तो भरधाव वेगाने गाडी चालवत होता. हा सर्व प्रकार सुरु असताना गाडी चुनाभट्टी रोडवरील प्रियदर्शनी पार्कपर्यंत पोहोचली होती. त्यावेळी मी त्या चालकाला गाडी थांबव, असे सांगितले. पण त्याने माझे काहीही ऐकले नाही. त्यावेळी त्याने कोणाला तरी फोन केला.

मी जोरजोरात हाका मारु लागले. ओरडायला लागले. त्यावेळी दोन दुचाकीस्वार आणि एका रिक्षाचालकाने मला त्या उबरमधून बाहेर काढण्यास मदत केली. त्यांनी त्या गाडीतून मला बाहेर काढले. मी सध्या सुरक्षित आहे. पण नक्कीच या सर्व प्रसंगामुळे मी खूप घाबरले आहे. सध्या मनवाची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे.


हेही वाचा :

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी आयुष्मानच्या ‘डॉक्टर जी’ चित्रपटाने कमावला कोटींचा गल्ला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -