Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन A लिस्ट अभिनेत्री फुकटात काम करतात... प्रियंकाच्या नाराजीवर कंगनाची प्रतिक्रिया

A लिस्ट अभिनेत्री फुकटात काम करतात… प्रियंकाच्या नाराजीवर कंगनाची प्रतिक्रिया

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या विविध कारणांमुळे चर्चेत असते. अलीकडच्या काळात प्रियंका बॉलिवूडबाबत अनेक नवनवीन खुलासे करत आहे. नुकताच प्रियंकाने चित्रपटांमध्ये मिळण्याऱ्या मानधनाबाबत वक्तव्य केलं आहे. यावेळी प्रियंकाने आपल्या 22 वर्षाच्या करिअरमध्ये कधीच तिला सोबत काम करणाऱ्या अभिनेत्या इतके मानधन मिळाले नाही. याबाबत तिने खंत व्यक्त केली. फक्त नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘सिटाडेल’ वेब सीरिजमध्ये तिला अभिनेत्या इतकेच मानधन मिळाले. प्रियंकाच्या या मुलाखतीमधील व्हिडीओवर प्रतिक्रिया देत कंगनाने प्रियंकाची बाजू घेतली आहे.

कंगनाने केली प्रियंकाची पाठराखण

- Advertisement -

बॉलिवूडची धाकड गर्ल कंगना रणौत नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अशातच कंगनाने बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा एक व्हिडीओ शेअर करत तिची बाजू घेतली आहे. कंगनाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत लिहिलंय की, “हे खरे आहे की माझ्या आधी जवळपास सर्वच अभिनेत्री या शतकानुशतके जुन्या परंपरेपुढे झुकल्या. समान वेतनासाठी लढणारी मी पहिली आहे आणि या काळात मला सर्वात वाईट गोष्टीचा सामना करावा लागला. मी ज्या भूमिकेसाठी लढत होते त्याच भूमिकेसाठी माझे सहकलाकार विनामूल्य काम करत होते.”

Kangana Ranaut on Priyanka Chopra's engagement with Nick Jonas: I'm upset

- Advertisement -

कंगनाने पुढे लिहिलंय की, “मी हे दाव्याने सांगू शकते की, अनेक A लिस्ट अभिनेत्री फुकटात काम करतात. एवढंच नाही तर, त्या इतर प्रकारची पसंती देखील देतात. त्या घाबरतात की भूमिका इतर कोणाकडे जावू नये. त्यानंतर, मोठ्या धूर्ततेने, ती सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री असल्याचे आर्टिकलही प्रसिद्ध करते. चित्रपटसृष्टीतील प्रत्येकाला माहित आहे की मीच केवळ एकमेव अभिनेत्री आहे जी सहअभिनेत्या इतके मानधन घेते.”


हेही वाचा :

Swara Bhasker: ‘बलात्काराच्या आरोपीला वाचवत…’, कुस्तीपटूंना पाठिंबा देणारे स्वरा भास्करचे ट्वीट चर्चेत

- Advertisment -