Ankush Chaudhari: मराठी सिनेसृष्टीत कोरोनाचा शिरकाव! अभिनेता अंकुश चौधरी कोरोना पॉझिटीव्ह

अंकुशने ( Ankush Chaudhari) सोशल मीडिया पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. अंकुशने त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. अंकुशवर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत.

marathi actor ankush chaudhari tested corona positive
मराठी सिनेसृष्टीत कोरोनाचा शिरकाव! अभिनेता अंकुश चौधरी कोरोना पॉझिटीव्ह

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड सेलिब्रेटी कोरोनाच्या विळख्यात आहेत मात्र आता कोरोनाने मराठी सिनेसृष्टीतही शिरकाव केला आहे. मराठी अभिनेता अंकुश चौधरीला कोरोनाची लागण झाली आहे. ( Ankush Chaudhari corona Positive ) अंकुशने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. अंकुशवर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत. अंकुशने त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मराठी सिनेसृष्टी पुन्हा एकदा जोशाने सुरू झाली होती. मराठी कलाकार त्यांची काळजी घेऊन शुटींग करत होते. मात्र कोरोनाने मराठी कलाकारांनाही निशाणा बनवत मराठी सिनेसृष्टीत शिरकावा केला आहे.

अभिनेता अंकुश चौधरीने ट्विट करत त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. अंकुशने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत आणि तुमचे आशिर्वाद आहेच. कोरोनावर मात करुन पुन्हा त्याच जोशात आणि त्याच जोमात पुन्हा तुमच्यासमोर येईल, असे विश्वास अंकुशने व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे अंकुशने त्याच्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या आणि काही लक्षणे दिसल्यास त्वरित कोरोना चाचणी करुन घ्या, अशी विनंती केली आहे.

अंकुश चौधरी सध्या मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. अंकुश काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाह वरील मी होणार सुपरस्टार या रिअँलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून दिसला होता. या कार्यक्रमातही अंकुश तुफान कल्ला केला होता. त्याचप्रमाणे अंकुशने बिग बॉस मराठीच्या घरातही हजेरी लावली होती. अंकुशच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी अंकुश बिग मराठीच्या मंचावर गेला होता.

अंकुश चौधरीच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचे झाले तर अंकुश आगमी काळात ‘लक डाऊन बी पॉझिटीव्ह’ (Luck down be positive)  या मराठी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात अंकुश चौधरीसोबत अभिनेत्री प्राजक्त माळी (prajkta mali) देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. अंकुश आणि प्राजक्ता ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सिनेमाचे एक जबरदस्त गाणे आणि सिनेमाचे फ्रेश पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हा सिनेमा म्हणजे एक संपूर्ण फॅमिली फिल्म असणार आहे.


हेही वाचा – Kapil Sharma Show फेम अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीला कोरोनाची लागण