Jitendra Joshi: ‘कोरोनाने मला निवडले पण कोणत्या ते रिपोर्ट आल्यावर कळेल’ – जितेंद्र जोशी

जितेंद्र मराठी सिनेसृष्टीतील सर्वांनाचा लाडका अभिनेता आणि जवळचा मित्र आहे. जितूच्या या पोस्टनंतर अनेक मराठी कलाकारांनी त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.

marathi actor Jitendra Joshi tested corona positive
Jitendra Joshi: 'कोरोनाने मला निवडले पण कोणत्या ते रिपोर्ट आल्यावर कळेल' - जितेंद्र जोशी

कोरोनाने अखेर मराठी सिनेसृष्टीत शिरकाव केला आहे. सुप्रसिद्ध मराठी अभिनेता जितेंद्र जोशीला कोरोना लागण (Jitendra Joshi Corona Positive )  झाल्याचे समोर आले आहे. जितेंद्रने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. जितेंद्रला कोरोनाची सर्व लक्षणे जाणवल्याने त्याचे घरीत होम कोविड सेल्फ टेस्ट किटने कोरोना चाचणी केली असता त्याची चाचणी पॉझिटीव्ह आली. जितेंद्रने सेल्फ टेस्ट किटमधील पॉझिटीव्ह आलेल्या रिपोर्टचा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. सेल्फ टेस्ट किटवरील चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर जितेंद्रने लगचेच RTPCR टेस्ट केली असून त्याचे रिपोर्ट येणे अजून बाकी आहे. जितेंद्रला कोरोनाची लागण झाली आहे की कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची हे या रिपोर्टमुळे कळणार आहे. जितेंद्रने त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करण्याची विनंती आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27)

कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या जितेंद्रने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिलीय. त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलेय की, ‘कोरोना ने मला निवडले. अत्यंत त्रासदायक आणि तापदायक अनुभव आहे. ताप तर आहेच शिवाय डोकेदुखी, अंगदुखी आणि सर्व लक्षणे आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी ही विनंती. माझे RTPCR रिपोर्ट्स लवकरच मिळतील. वैद्यकीय उपचार सुरू आहेत. नेमका कुठला corona आहे ते RTPCR reeport आल्यावर कळेल’.

जितेंद्र मराठी सिनेसृष्टीतील सर्वांनाचा लाडका अभिनेता आणि जवळचा मित्र आहे. जितूच्या या पोस्टनंतर अनेक मराठी कलाकारांनी त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. ‘काळजी घे जीतू’, असे म्हणत अभिनेत्री प्रिया बापटने जीतू विषयी प्रेम व्यक्त केले आहे. तर ‘काळजी घे तुझ्या प्रकृतीत लवकर सुधार होऊदेत’, अशी प्रार्थना अभिनेत्री सई ताम्हणकर हीने केली आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री क्षिती जोग, गायक राहूल देशपांडे, अमृता खानविलकर, नीना कुलकर्णी, प्रसाद ओक , सुयश टिळक, स्पृहा जोशी सारख्या अनेक मराठी कलाकारांनी देखील जितेंद्र जोशीच्या पोस्टवर कमेंट करत त्याच्यासाठी प्रार्थना आणि प्रेम व्यक्त केले आहे.

बिग बॉस मराठीचे हे स्पर्धक कोरोना पॉझिटीव्ह 

बिग बॉस फेम आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना देखील सोमवारी कोरोनाची लागण झाली. तृप्ती देसाई सध्या घरीच कोरोनावर उपचार घेत आहेत. तर दुसरीकडे बिग बॉस मराठी 3चा वाइल्ड कार्ड स्पर्धक असलेल्या आदिश वैद्यला देखील कोरोनाची लागण झाली आहे. आदिशने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत ही माहिती दिली. तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


हेही वाचा –  Trupti desai: नियमांचे पालन केले, अखेर कोरोनाने गाठलेच – तृप्ती देसाई