Kiran Mane : इंदिरा गांधींवर टीका करायचो, पण तेव्हा अशी दहशत नव्हती, किरण मानेंचा संताप

marathi actor kiran mane first reactoin removed from the serial mulgi zali ho
इंदिरा गांधींवर टीका करायचो, पण तेव्हा अशी दहशत नव्हती, किरण मानेंचा संताप

राजकीय घडामोडींवर भाष्य केलेल्याने अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह या वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकल्याची घटना घडली आहे. यानंतर सोशल मीडियावर अनेक संपातजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. यानंतर किरण माने यांच्याकडूनही चॅनलच्या भूमिकेवर संताप व्यक्त करण्यात आला आहे. इंदिरा गांधींवर टीका करायचो, पण तेव्हा अशी दहशत नव्हती अशाप्रकारचे मत किरण माने यांनी व्यक्त केलं आहे. एक खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी या घटनेवर आपले परखड मत व्यक्त केलं आहे. किरण माने सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर आपली रोखठोक भूमिका मांडत असतात. त्यांच्या या पोस्ट नेहमीच चर्चेत असतात.

किरण माने म्हणाले की, “ही झुंडशाही अशीच सुरु राहणार आहे. त्यामुळे शिवबा- तुकोबांच्या आणि शाहु-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे घडंलय. मात्र या महाराष्ट्रात अशी झुंडशाही खपवून घेतली जाणार नाही. जर मला न्याय मिळाली नाही तर झुंडशाहीविरोधात बोलणार मी मागे पुढे पाहणार नाही हे तुम्हाला सांगू इच्छितो. मला न्याय मिळाला तर खूप लोकं याविरोधात बोलण्यास समोर येतील. त्यामुळे काय करायचे हे लोकांनी ठरवावे. परंतु माझ्य़ा कोणत्याही पोस्टमध्ये मी जातीवादावर, विनाकारण पातळी सोडून टीका केलेली नाही.”

ते पुढे म्हणाले की, “आम्ही नाटकांमध्ये काम करताना काँग्रेसवर इंदिरा गांधी, राजीव गांधी यांवर टीका करायचो. मात्र तेव्हा काँग्रेस नेते यावर टाळ्या वाजवायचे. मात्र तेव्हा अशी टीका करुन नका किंवा दहशत पसरवू नका असे म्हणत नव्हते. पण आता एक वाक्य जरी लिहिलं तर तुम्ही असं कसं लिहू शकता म्हणत दहशत माजवली जातेय.”

“मला ट्रोल करत माझ्यावर बरीच घृणास्पद टीका केली गेली. त्यावेळी चिडून काही वक्तव्ये त्या ट्रोलर्सच्या विरोधात केली आहेत. पण मी कोणाचे नाव घेऊन अर्वाच्च शब्दात काही बोललो नाही. ही झुंडशाही आहे.”

“आम्ही दोन प्रेक्षक असले तरी प्रयोग करतो अशी तिरकस पोस्ट मी केली होती. ती पोस्ट लावून धरत आमच्या नेत्याला बोललो असं म्हणत माझ्याविरोधात त्यांनी अक्षरश: स्टार प्रवाहच्या पेजवर कॅम्पेन चालवलं आणि मालिकेतून मला काढून टाकण्यात आले, महाराष्ट्रात असं नाही होणार. असं मला वाटले कारण अशी झुंडशाही फक्त बिहार-यूपीमध्ये चालू शकते. पण मी देखील याचा बळी ठरलोय. पण मी यातून पुन्हा खंबीरपणे उभा राहीन. असंही ते म्हणाले आहेत.


याद राखा कोणाच्या भाकरीवर टाच आणाल तर योग्य नाही, जितेंद्र आव्हाडांचा किरण मानेंना मालिकेतून काढल्यावरून संताप