Ramesh Deo Passes Away: अशी आहे रमेश देव आणि सीमा देव यांची लव्हस्टोरी

Marathi Actor Ramesh Deo Passes Away ramesh and seema deo love story
Ramesh Dev Passes Away: अशी आहे रमेश देव आणि सीमा देव यांची लव्हस्टोरी

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे आज निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे रमेश देव यांनी वयाच्या ९३व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. याबाबतची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली. मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. गेल्या महिन्यात ३० जानेवारीला त्यांच्या जन्मदिवस साजरा करण्यात आला होता. विशेष म्हणजे रमेश देव आणि सीमा देव यांची लव्हस्टोरी चांगलीच गाजली होती. चित्रपटसृष्टीतील बेस्ट ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन कपल म्हणून त्यांना ओळखले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by RetroBollywood (@retrobollywood)

रमेश देव यांनी आपल्या करिअरची सुरुवात १९५० साली मराठी चित्रपटातून केली होती. छोट्या व्यतिरेखा साकारून त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले, ज्यानंतर हळूहळू त्यांना मोठ्या भूमिका मिळू लागल्या. त्यावेळेस नलिनी सराफ म्हणजे सीमा देव यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपली ओळख बनवण्यास सुरुवात केली होती. १९६० साली त्यांनी पहिला चित्रपट ‘जगाच्या पाठीवर’मधून पर्दापण केले, ज्यामध्ये रमेश देव यांनी भूमिका साकारली होती. या चित्रपटातून रमेश देव आणि सीमा देव या जोडीने पडद्यावर धमाल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात रमेश देव आणि सीमा देव यांनी एकत्र काम केले आणि ते चित्रपट चांगलेच गाजले.

१९६२ मध्ये ‘वरदक्षिणा’ या चित्रपटात त्यांनी सोबत काम केले. या चित्रपटादरम्यान रमेश देव आणि सीमा देव यांना एकमेकांवर प्रेम झाले. त्यामुळे कोणताही विलंब न करता त्यांनी त्याच वर्षी लग्न केले. १ जुलै २०१३मध्ये दोघांच्या लग्नाला ५० वर्ष पूर्ण झाले होते. यावर्षी दोघांचा लग्नाला ५९ वर्ष पूर्ण होणार होते. ज्यावेळी लग्नाला ५० वर्ष पूर्ण झाली होती तेव्हा रमेश देव म्हणाले होते की, ‘माझी सीमासोबतची केमिस्ट्री खूप चांगली होती. आमचा अभिनय आणि व्यक्तिरेखा नैसर्गिक वाटतात, कारण माझी सहाय्यक कलाकार मस्तीखोर आहे. चित्रपटसृष्टीत आमच्यापेक्षा जुने कोणतेही कपल अजूनही एकत्र आहेत, असे मला वाटत नाही.’


हेही वाचा – Ramesh Deo Death | ज्येष्ठ मराठी अभिनेते रमेश देव यांचे निधन