Sunday, February 21, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Good News: शंशाक म्हणाला मी 'बाबा' झालो रे!

Good News: शंशाक म्हणाला मी ‘बाबा’ झालो रे!

अभिनेता शशांक केतकरला बाळ झाले.

Related Story

- Advertisement -

‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून घराघरात पोहोचणारा श्री म्हणजेच सर्वांचा लाडका अभिनेता शशांक केतकर बाबा झाला आहे. नुकताच त्यांनी बाळासोबतचा फोटो एन्स्टाग्रामवर शेअर करत त्याच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. या फोटोमध्ये शशांक खूपच आनंदी दिसत आहे. मात्र, शंशाकने आपल्या बाळाचा चेहरा चाहत्यांना दिसून दिला नाही. तसेच त्यांनी हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘ऋग्वेद शशांक केतकर’, याचा अर्थ शशांकला मुलगा झाला असावा, अशी शक्यता नाकारता येत नाही.

चाहत्यांना दिली खुशखूबर

अभिनेता शशांक केतकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. नवनवीन फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांशी अनेक गोष्टी शेअर करत असतो. त्यानुसार त्यांनी आपल्या बाळासोबतचा फोटोही शेअर करत आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

- Advertisement -

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

शशांक केतकरने २०१७ मध्ये प्रियांकासोबत लग्न केले. लग्नानंतर त्यांनी अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या होत्या. त्यांनी २५ डिसेंबरला पत्नी प्रियांका प्रेग्नेंट असलेल्याची गोड बातमी दिली होती. ख्रिसमसच्या दिवसांत आपल्याकडे सांताक्लॉज येणार असल्याची बातमी शेअर करत त्यांनी प्रियांकाबरोबरचा एक गोड फोटो शेअर केला होता.


- Advertisement -

हेही वाचा – करिना, सैफ दुसऱ्यांदा झाले आई बाबा


 

- Advertisement -