घरताज्या घडामोडीअलका कुबल भडकल्या, 'असे कलाकार कोणाच्या जिवावर माज करतात'

अलका कुबल भडकल्या, ‘असे कलाकार कोणाच्या जिवावर माज करतात’

Subscribe

‘आई माझी काळुबाई’ मालिका ही सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. मालिकेतील अचानक झालेल्या आर्या म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या एक्झिटमुळे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता या मालिकेत आर्याची भूमिका अभिनेत्री वीणा जगताप साकारणार आहे. एकाबाजूला मालिकेच्या निर्मात्या प्राजक्ताला मालिकेतून काढून टाकल्याचे म्हणत आहे. तर दुसऱ्याबाजूला प्राजक्ताने सहकलाकाराने केलेल्या शिवीगाळमुळे मालिका सोडल्याचे स्पष्ट केलं आहे. अलका कुबल यांनी प्राजक्ताला मालिकेतून काढून टाकण्यामागचे अनेक खुलासे केले आहेत. एका मराठी युट्यूब चॅनलशी बोलताना त्यांनी प्राजक्ता काढण्यामागचं कारण सांगितलं आहे.

काय म्हणाल्या अलका कुबल?

‘आई माझी काळुबाई’च्या निर्मात्या अलका कुबल यांनी एका मराठी युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, ‘सतत प्राजक्याचे सेटवर नखरे सुरू असायची. मध्येच डोकं दुखतंय म्हणायची, मध्येच शुटिंग थांबवायची, मध्येच रडत बसायची. शरद पोंक्षे आणि मालिकेतील अन्य कलाकारांनी अनेकदा प्राजक्ताला काढून टाकण्याचा मला सल्ला दिला होता. पण तिला मी समजून घेतलं. तसेच तीन कधीकधी चार ते सहा तास रुममधून बाहेर येत नव्हती. सगळे जण तिची वाट पाहत बसायचे. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता या देखील तिच्या थांबायचे. तिला कसलीच लाज नाही. मालिकेच्या सेटवर सगळ्यांना दम देणे, नखरे करणे हे तिचे सुरुच होत. तिच्या चेहऱ्यावर शूट झाल्यानंतर पश्चात्तापाचा लवलेश नसायचा. तिच्यामुळे नाइलाजाने रात्रीचे शूट करावे लागत होते. अशा कलाकारांमध्ये एवढी हिंमत कुठून येत, कोणाच्या जिवावर माज करतात.’

- Advertisement -

पुढे म्हणाल्या की, तिला समज देऊन दुसऱ्यांदा संधी दिली. पण तरीही तिच्या वागणुकीत काहीच बदल झाला नाही. शेवटी तिला मालिकेतून काढण्याचा निर्णय घेण्यात आला.


हेही वाचा – ‘तारक मेहता’मधील टप्पूच्या स्वॅगवर बबिता झाली फिदा, म्हणाली…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -