घरमनोरंजनAnagha Atul : 'दुर्लक्ष तरी किती करायचं?'...अभिषेक घोसाळकरांच्या हत्येवर अभिनेत्रीचा संताप

Anagha Atul : ‘दुर्लक्ष तरी किती करायचं?’…अभिषेक घोसाळकरांच्या हत्येवर अभिनेत्रीचा संताप

Subscribe

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या हत्येनं महाराष्ट्र पुरता हादरुन गेला आहे. बोरिवलीमधील एका स्थानिक कार्यकर्त्याने गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली. अभिषेक घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसने स्वतः आत्महत्या केली. या प्रकरणावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनीही राग व्यक्त केला आहे.

पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची लेक अभिनेत्री अनघा अतुल ही नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी अनघा नेहमी स्पष्टपणे आपले मत मांडत असते. बोरीवलीमध्ये घडलेल्या अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी अनघाने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

काय अनघा अतुलची पोस्ट?
अनघाने अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा व्हिडीओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “आपल्या आजूबाजूला हे नक्की चाललंय काय? अशाप्रकारच्या बातम्या अस्वस्थ करतात. आपण किती दुर्लक्ष करायचं?” मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अनघा भगरेने सोशल मिडीयावर केलेली पोस्ट सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

Anagha Atul Post

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय
शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. साडीवाटपाच्या कार्यक्रमासाठी बोलावून मॉरिस मॉरिस नोरोन्हा या व्यक्तीने घोसाळकर यांच्यासमवेत ‘फेसबुक लाइव्ह’ केलं व नंतर अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर त्याने त्याच बंदुकीतून स्वतःवरही गोळ्या झाडून घेतल्या. या गोळीबारानंतर उपाचारांदरम्यान अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू झाला.
मागील दोन आठवड्यांमध्ये राजकीय वादातून गोळीबार झाल्याची ही दुसरी घटना आहे. याआधी कल्याणच्या आमदाराने पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबाराची घटना घडली होती. ही घटना ताजी अशताना घोसाळकरांची झालेली हत्या ही कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते, असा विरोधकांचा आरोप आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -