घरताज्या घडामोडीचाहत्यांची लाडकी अभिनेत्री ऋता दुर्गुळे दिसणार नव्या भुमिकेत!

चाहत्यांची लाडकी अभिनेत्री ऋता दुर्गुळे दिसणार नव्या भुमिकेत!

Subscribe

अभिनेत्री ऋता दुर्गुळे हा मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहरा पहिल्यांदाच सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. आजपर्यंत ऋताने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, तिच्या दुर्वा आणि वैदेही या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे. तिचा स्वतःचा मोठा चाहता वर्ग आहे. ‘सिंगिंग स्टार’ या एका ग्रँड कार्यक्रमात ती पहिल्यांदाच सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

मालिका, नाटक आणि सिनेमा यांतून अभिनय करताना दिसणारी ऋता सूत्रसंचालनाचा नवा प्रयत्न करणार आहे. तिच्यासाठीदेखील हा अनुभव नवीन असणार आहे आणि या नव्या अनुभवासाठी तीदेखील उत्सुक आहे. ‘गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे असे’ म्हणत ऑगस्टपासून ‘सिंगिंग स्टार’ हा कार्यक्रम सुरू होणार आहे, पण या कार्यक्रमात कोण-कोण असणार आहे आणि हा कार्यक्रम काय आहे; या गोष्टी मात्र अजून गुलदस्त्यातच आहेत. ऋता दुर्गुळेला  पुन्हा एकदा स्क्रीनवर बघणं ही तिच्या चाहत्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

मी पहिल्यांदा सूत्रसंचलन करत आहे. त्यामुळे थोडं जास्त टेश्नन आहे. पण सोनीची संपूर्ण टीम माझ्याबरोबर असल्यामुळे हा शो करतानाही खूप मज्जा येणार आहे. या लॉकडाऊनमध्ये सतत मनात यायचं की आता मालिका सोडून काहीतरी वेगळं करायचं आहे आणि शो मला मिळालं. त्यामुळे जास्त आनंद होत आहे. आजपर्यंत पल्लवी जोशी, अमेय वाघ, स्पृहा जोशी या सगळ्यांची सुत्रसंचलन बघत आले आहे. यातील कोणाला मला कॉपी करायचं नाहीये पण नक्कीच यांच्याकडून मी जे काही शिकले आहे ते मला माझ्या सूत्रसंचालनातून दिसेल.- ऋता दुर्गुळे, सुत्रसंचालक

- Advertisement -

हे ही वाचा – चाहत्यांनो सुशांतचा शेवटचा चित्रपट आज ‘या’ वेळेत होणार प्रदर्शित!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -