अभिनेत्री केतकी चितळे तीच्या वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. केतकीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. केतकीच्या या पोस्टनंतर तीला शिवसेनेच्या एका विभाग प्रमुख्याने धमकी दिली आहे.
शिवसेना अध्यक्ष प्रमुख आणि तरीही यांना पोस्ट कळली नाही. हे आहेत नेते, ज्यांना मराठी कळत नाही. कळतं काय तर लोकांचे पर्सनल नम्बर घेऊन, त्यांच्यावर खोटे आरोप करून, त्यांना धमक्या देणे!
Posted by Ketaki Chitale on Monday, July 13, 2020
केतकीने फसबुकवर एक स्क्रीन शॉर्ट टाकला आहे आणि हे शेअर करताना केतकीने लिहीले आहे की ‘शिवसेना अध्यक्ष प्रमुख आणि तरीही यांना पोस्ट कळली नाही. हे आहेत नेते, ज्यांना मराठी कळत नाही. कळतं काय तर लोकांचे पर्सनल नंबर घेऊन, त्यांच्यावर खोटे आरोप करून, त्यांना धमक्या देणे!’ असे म्हटले आहे.
काय आहे स्क्रिनशॉटमध्ये
‘महाराजांच्या नावाचा उल्लेख एकेरी करता तुम्ही आणि हसता… महाराष्ट्रामध्ये राहून त्यांच्या जीवावर नाव कमावले आणि आज त्यांचा एकेरी उल्लेख करता… मी शिवसेना विभाग प्रमुख आहे. पुन्हा खोटारडे लोक असा शब्द केला ना.. मग बघ,’ असे म्हटले आहे.
काय होतं केतकीच्या पोस्टमध्ये
केतकीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा!
सोशल मिडीयावर ‘मराठी’ असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे २० ते २५ वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कस चे रिंग मास्टर असतात.
अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!! सुधारणा करा बाळांनो, शिका. असंही केतकीने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे.
हे ही वाचा – Sushant Suicide Case: पोलिसांचा उलट तपास सुरु; मोठ्या अभिनेत्याच्या PR ची होणार चौकशी