ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे कोरोनामुळे निधन

marathi-actress-madhavi-gogte-passed-away
ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन

मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलीवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे कोरोनामुळे आज निधन झाले. वयाच्या ५८व्या वर्षी माधवी यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. माधवी यांच्या अशा अचानक जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

माधवी यांनी भ्रमाचा भोपळा, गेला माधव कुणीकडे या नाटकांमधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलीवूड मध्येही काम केले. काही मराठी मालिकांमधूनही त्या घराघरात पोहचल्या. मिसेस तेंडुलकर, कोई अपना सा, ऐसा कभी सोचा न था, तुझ माझ जमतय एक सफर, बसेरा अशा अनेक हिंदी मराठी मलिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोणाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तबेतीत सुधारणा होत असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.