Wednesday, July 28, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी सिद्धार्थ विचारतोय तुला काय हवंय?

सिद्धार्थ विचारतोय तुला काय हवंय?

सिद्धार्थच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्याचे आभार मानले

Related Story

- Advertisement -

मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सिद्धार्थ त्याच्या हटके स्टाईलमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. मात्र सिद्धार्थ चर्चेत येण्यामागे खास कारण आहे. कारण सिद्धार्थ विचारतोय तुला काय हवंय? त्याच्या या पोस्टनंतर अनेक कमेंट येत आहे ज्यातून अनेक जण सिद्धार्थचे आभार मानताना दिसत आहेत. सिद्धार्थने लिहिलेले ही पोस्ट नैराश्यावर भाष्य करताना दिसत आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक जण नैराश्याचा सामना करत आहेत. त्यामुळे सिद्धार्थच्या या पोस्टमुळे त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. (Marathi Actress Sidharth chandekar social media post about depression )

- Advertisement -

तुला काय हवंय? हा प्रशन स्वत:ला विचारल्यावर काय उत्तर येत? कुणाचा आवाज ऐकू येतो? तुझाच? की त्यांचा? त्यांच्या अपेक्षास त्यांच्या गरजा आणि त्यांच्या इच्छा आरडा ओरडा करु लागतात? का शांतपणे हाताची घडी घालून उभा असलेल्या तुझा आवाज घुमतो तुझ्या कानात? त्यांना जरा वेळ बाहेर काढून दार लावशील? आणि आरशात बघशील एकदा? असं म्हणतात स्वत:चा आवाज डोळ्यातून दिसतो. टक लावून बघू शकतोस स्वत: कडे? नक्की काय हवंय? काय होतंय? स्वत:च्याच डोक्यावरुन हळुवार हात फिरव, थोडं थोपट. बघ सांगता येतंय का? रडू फुटलं तर स्वत:लाच बिलगून बस थोडा वेळ. समजूत घाल. चांगलं चुंगलं करुन खाऊ घाल. विषय बदल. आजचा दिवस कसा गेला विचार, गप्पा मार. पण मग परत विचार. ‘तुला’ काय हवंय? उत्तर येई पर्यंत सोडू नकोस. अशी पोस्ट सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियावरुन केली आहे.

सिद्धार्थच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्याचे आभार मानले आहेत. दुसऱ्यांचा विचार करता करता स्वत:ला काय हवं आहे हे विसरूनच जातो अशा प्रतिक्रिया युझर्सनी दिल्या आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – यंदा मनसेच्या विश्वविक्रमी दहीहंडीला प्रविण तरडेंचा पाठिंबा म्हणाले,१०० टक्के नाचायला येणार

 

- Advertisement -