घरमनोरंजन‘ट्रोलर्स’ना मात्र काही कळणार नाही...अभिनेत्री स्नेहलता वसईकरचं ट्रोलर्सना चोख उत्तर

‘ट्रोलर्स’ना मात्र काही कळणार नाही…अभिनेत्री स्नेहलता वसईकरचं ट्रोलर्सना चोख उत्तर

Subscribe

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत महाराणी सोयराबाई यांची व्यक्तिरेखा स्नेहलताने (snehalata vasaikar) साकारली होती.स्नेहलताने जे फोटोशूट केले त्यानंतर काहींनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. पण या ट्रोल करणाऱ्यांना स्नेहलताने तिच्या पोस्ट मधून चोख उत्तर दिले आहे.

छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एका म्हणजे अभिनेत्री स्नेहलता वसईकर. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत महाराणी सोयराबाई यांची व्यक्तिरेखा स्नेहलताने (snehalata vasaikar) साकारली होती. या व्यक्तिरेखेमुळे स्नेहलता घराघरात पोहोचली. सेलिब्रिटी सोशल मीडियावर (social media) मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात तसेच अभिनेत्री स्नेहलता सुद्धा तिच्या नव्या फोटोशूट मूळे चर्चेत आली आहे. स्नेहलताने जे फोटोशूट केले त्यानंतर काहींनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. पण या ट्रोल करणाऱ्यांना स्नेहलताने तिच्या पोस्ट मधून चोख उत्तर दिले आहे. स्नेहलताने स्वतःचे तीन फोटो शेअर करून तिला ज्यांनी ट्रोल केले त्यांच्या साठी एक पोस्ट शेअर केली आहे. स्वतःच्या भावना शब्दांत मांडून तिने ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.

 

- Advertisement -

आपल्या पोस्ट मधून काय म्हणाली स्नेहलता ?

स्नेहलताने स्वतःचे तीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत एक पोस्ट शेअर करत आणि फोटोला कॅप्शन देत स्नेहलता लिहिते,
नमस्कार मी(snehalata vasaikar)स्नेहलता वसईकर, अर्थातच मी अभिनेत्री असल्यामुळे विविध भूमिकांमधून मी आपल्या समोर येत असते. माझ्या प्रत्येक भूमिकेवर मायबाप रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं… काही चुकलं तर समजूनही घेतलंत. ऐतिहासिक भूमिकांपासून मॉडर्न भूमिका असा प्रवास केला. प्रत्येक भूमिकेतून, अनुभवांमधून खूप गोष्टी शिकले. अजूनही वैविध्यपूर्ण भूमिका साकारायच्या आहेत, त्यातूनही अनेक गोष्टी शिकायच्या आहेत…. पण काय सांगू…? हे ट्रोलर्स….

- Advertisement -

(पोस्ट मधील पहिला फोटो),
कधी-कधी असंच कमरेवर हात ठेऊन या ट्रोलर्सबरोबर भांडव असं वाटतंय… त्यांना सांगावस वाटतं, तुमच्यावरील ‘संस्कार’ तुमच्या कपड्यांवरून नाही तर तुमच्या विचारांमधून कळतात. थोरा-मोठ्यांचे गुण आपल्या अंगी उतरवायचे असतात, त्यातील अनेक गोष्टी आपल्या आचरणात आणायच्या असतात…

एवढं सगळं बोलूनही ‘ट्रोलर्स’ना मात्र काही कळणार नाही, न त्यांच्या वागण्या-बोलण्यात, सोशल मीडियावर व्यक्त होण्यात काही बदल होणारं आहे. याउलट त्यांच्या चुकीच्या वक्तव्याचा, कमेंट्सचं ते समर्थन आणि काही जण त्यांची पाठराखण करतात…

म्हणून (हा दुसरा फोटो),
त्यांच्यात न झालेला बदल पाहून, ‘पालथ्या घड्यावर पाणी…’ म्हणत स्वतःचं डोक्यावर हात मारून घ्यावासा वाटतो…
कलाकार हा आशावादी सुद्धा असतो. ‘मी एक कलाकार आहे आणि माझं एक खाजगी आयुष्य सुद्धा आहे तुम्ही समजून घ्याल’, अशी आशा करते. ऐतिहासिक मालिकेमधून भूमिका साकारताना त्या व्यक्तिरेखेशी प्रामाणिक राहण्याचा पूर्ण प्रयत्न असतो आणि ते थोर व्यक्तिमत्व म्हणजे आपण नव्हे याचं भानही… आम्ही कलाकार फक्त निमित्तमात्र असतो. जर अशा भूमिका साकारल्यानंतर त्या थोर व्यक्तिमत्त्वांचा जागी आम्हाला नेऊन बसवत असाल तर त्या थोर व्यक्तिमत्त्वांचा याहून मोठा अपमान काहीच नसेल…. पुन्हा सांगते मी रील आणि रियल लाईफ ही वेगवेगळी ठेवणच पसंत करते.

म्हणून (हा तिसरा फोटो)
हाताची घडी घालून निवांत…..
तुम्हा मायबाप प्रेक्षकांना माझी बाजू समजावून सांगण्याची तशी फार गरज नाही हे मला ठाऊक आहे… फक्त, आम्ही कलाकारही माणूस असतो…. वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी भुकेलेला…

तुमचीच,
स्नेहलता वसईकर.

 

अशा आशयाची पोस्ट लिहीत अभिनेत्री स्नेहलता वसईकरने तिला ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -