घरमनोरंजनMaylek Movie: आई-मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा 'मायलेक' चित्रपट, पोस्टर आऊट

Maylek Movie: आई-मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा ‘मायलेक’ चित्रपट, पोस्टर आऊट

Subscribe

2023 प्रमाणे 2024 हे वर्ष देखील मराठी सिनेरसिकांसाठी खूप खास ठरणार आहे. मराठी मनोरंजनसृष्टीत विविध धाटणीचे सिनेमे प्रदर्शित होत आहे. या वर्षामध्ये देखील मराठी सिनेरसिकांसाठी मनोरंजनाची खास मेजवणी असणार आहे. या वर्षामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले, अनेक चित्रपटांची घोषणा झाली, तर काही चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशातच मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली खरेचा ‘मायलेक’ हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून तिची लेकदेखील मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. नुकताच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. 19 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे

आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘मायलेक’ चित्रपटाच नुकतंच नवीन पोस्टर रिलीज झाले. या पोस्टरद्वारे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. येत्या 19 एप्रिलला माय-लेकीची ही गोड कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट प्रत्येक मुलगी आणि आईला जवळचा वाटेल.

- Advertisement -

 ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत या चित्रपटाच्या प्रियांका तन्वर या दिग्दर्शिका आहेत. कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे निर्माते असून नितीन प्रकाश वैद्य असोसिएट प्रोड्यूसर आहेत. या सिनेमात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने, महेश पटवर्धन, वंश अग्रवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने रिअलमधील मायलेक रीलमध्ये एकत्र पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

आई आणि मुलीचे नाते हे नेहमीच खास असते. कधी त्या मैत्रिणी असता. तर कधी त्यांच्यात रुसवे फुगवेही असतात. कधी मुलगी आई बनून आईला साथ देते. तर कधी आई मुलीच्या मागे खंबीरपणे उभी राहते. या नात्यातील अशीच अनोखी गंमत या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टरमध्ये सोनाली खरे आणि सनाया आनंद यांच्या नात्यातील सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता यांचे नाते कसे असणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -