घरमनोरंजनसुप्रिया पिळगावकर यांच्या डोक्याला ताप..मदत केली एकाला पोहचली मात्र भलत्यालाच

सुप्रिया पिळगावकर यांच्या डोक्याला ताप..मदत केली एकाला पोहचली मात्र भलत्यालाच

Subscribe

आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रीमध्ये सुप्रिया पिळगांवकर यांचे नाव आवर्जून घेतले जाते. गेली तीन दशकांहून अधिक काळ सुप्रिया पिळगांवकर यांनी मराठीसह हिंदी मालिका, सिनेमांमधून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. आजही अनेक मालिका आणि चित्रपटांमधून त्यांचा मनोरंजन विश्वात वावर आहे. सोशल मीडियावरही सुप्रिया पिळगांवकर अधिक सक्रिय असतात. नव्या प्रोजेक्टसंदर्भात माहिती देत त्या चाहत्यांशी संवाद साधतात. मात्र सोशल मीडियावर त्या एका वेगळा कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. एका एनजीओला मदत केल्यामुळे सुप्रिया पिळगावकर यांच्या डोक्याला ताप झाला आहे. एका एनजीओाला मदत करताना त्यांची मदत दुसऱ्याच एका संस्थेसा गेल्याचा धक्कादायक प्रकार सुप्रिया पिळगावकर यांच्या बाबतीत घडला आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करुन दिली आहे.

- Advertisement -

सुप्रिया पिळगावंकर यांनी ट्वीटमध्ये सांगितले की, साईट सेव्हरसीन नावाच्या एका एनजीओसा मदत त्यांनी आर्थिक स्वरुपात मदत केली. ही मदत त्या एनजीओच्या बँक खात्यामध्य़े जमा करण्यात आली. मदत पोहल्याचा मेसेजही त्यांना पेटीएमवर आला. मात्र सुप्रिया सुळे यांनी एनजीओला मदत पोहल्याचे विचारण्यासाठी कॉल केला तेव्हा एनजीओकडून मदत पोहचली नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी ही मदत भलत्याच अकाउंटला गेल्याचे सुप्रिय़ा पिळगांवकर यांच्या लक्षात आले.

पैशांचे ट्रांजेक्शन पूर्ण झाल्यानंतर सुप्रिया यांना स्क्रीनवर पेमेंट सक्सेफुल असा मेसेज आला. मात्र ही मदत एनओजीच्या अकाउंटवर नाही तर भलत्याचं अकाउंटवर पोहचली होती. असं सुप्रिया पिळगांवकर म्हणाल्या. त्यामुळे नागरिकांनी यापुढे कुणालाही मदत पाठवताना संबंधीत संस्थेचं नाव पुन्हा एकदा तपासण्याची विनंती त्यांनी केली आहे. तसेच आपल्याकडून घाईत ट्रान्झेक्शन करताना काही राहून गेल्याचं त्यांनी यावेळी ट्वीटमधून स्पष्ट केले.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -