घरमनोरंजनमराठी आणि हिंदी टेलिव्हिजन अभिनेते सुनील होळकर यांचे निधन

मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन अभिनेते सुनील होळकर यांचे निधन

Subscribe

मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते सुनील होळकर यांचं निधन झाले आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या अनेक दिवसांपासून ते लिव्हरसंबंधीत आजाराचा सामना करत होते. उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. सुनील यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात घरात आई, पत्नी आणि दोन मुलं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील होळकर मागील अनेक दिवसांपासून लिव्हर सोरायसिसच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते, मात्र शुक्रवारी 13 जानेवारी रोजी त्यांचं निधन झालं. सुनील यांनी हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये देखील काम केलं होतं, ‘गोष्ट एका पैठणीची’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटात ते शेवटचे दिसले होते. सुनील यांनी अशोक हांडे यांच्या चौरंग नाट्य संस्थेत अनेक वर्षे काम केले होते. त्यांनी 12 वर्षांहून अधिक काळ रंगभूमीच्या माध्यमातून काम केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Holkar (@holkar_sunil)

- Advertisement -

दरम्यान, सुनील होळकर यांना त्यांच्या मृत्यूची जाणीव झाली होती. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या मित्राला त्यांचा शेवटचा मॅसेज व्हॉट्सअॅप स्टेटसवर शेअर करण्यास सांगितला होता. त्यात लिहिलं होतं की ‘ही त्यांची शेवटची पोस्ट आहे’.

 

- Advertisement -

हेही वाचा :

उर्फीला मुंबई पोलिसांकडून समन्स; चित्रा वाघांच्या तक्रारीची दखल

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -