घरCORONA UPDATEVideo - कोरोना रॅप साँग, ‘एकटं कोणी नाहीये’!

Video – कोरोना रॅप साँग, ‘एकटं कोणी नाहीये’!

Subscribe

कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. दररोज कोट्यवधींचे नुकसान होत आहे. अशा नैराश्यमय वातावरणात देशवासीयांना धीर देण्यासाठी मराठी कलाकार पुढे आले आहेत. त्यांनी एका गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्यातून ते करोना विरोधात लढण्याची प्रेरणा देत आहेत.

- Advertisement -

‘एकटं कोणी नाहीये’ असं या गाण्याचे बोल आहेत. महाराष्ट्र डीजीपीआरच्या ट्विटर हँडलवरुन या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या गाण्यामध्ये अमेय वाघ, सखी गोखले, रुचा आपटे, पर्ण पेठ, सुजय जाधव असे अनेक लोकप्रिय कलाकार दिसत आहेत. सौरभ भालेराव याने या गाण्याला संगीत दिलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

यापूर्वी बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि अजय देवगण यांनी देखील करोनावर गाण्यांची निर्मिती केली होती. सलमानचे प्यार करोना या गाण्यामधून लोकांना घरातच राहण्याचा संदेश दिला होता. तर अजयने ठहर जा या गाण्यामधून करोना विरोधात लढण्यासाठी देशवासीयांना प्रेरणा दिली होती.

- Advertisement -

हे ही वाचा – Video – घराचा झाला सेट, कुटुंब बनलं क्रू मेंबर आणि तयार झाली मालिका!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -