Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन मराठी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी कपल सखी आणि सुव्रतला झाली कोरोनाची लागण

मराठी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी कपल सखी आणि सुव्रतला झाली कोरोनाची लागण

सुव्रतने त्याच्या तब्येतीची तसेच आगामी प्रोजेक्टची माहिती दिली आहे. आणि चाहत्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन देखील केलं आहे.

Related Story

- Advertisement -

मराठी सिनेसृष्टीतील क्युट कपल सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुव्रतने सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचे संगितले आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी दोघांना कोरोना झाल्याचे कळले होते पण लोकांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण होऊ नये म्हणून कोणालाही याची माहिती दिली नाही. सुव्रतने सोशल मीडिया अकाऊंट वर पोस्ट करत लिहलं आहे की,” 12 एप्रिल रोजी आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी सखी आणि मी एकमेकांना एक युनिक गिफ्ट दिलं आहे. आम्हा दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही दोघांना कोणत्याही बाहेरील व्यक्तीला याबद्दल सांगून चिंतेच वातावरण निर्माण करायचे नव्हते. योग्य औषध,आराम,मेडिटेशन केल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या पायावर उभे राहत आहोत. हळू हळू आम्ही एक्सरसाईझ करण्यास सुरूवात केली आहे. मागील काही प्रोजेक्ट करिता मी वजन कमी केलं होतं आणि आजारपणामुळे माझी शारीरिक क्षमता कमी झाली होती. आता माझ्या तब्येतीत सुधारणा होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sula (@suvratjoshi)

- Advertisement -

तसेच सुव्रतने संगितले की लवकरच सई प्लाझ्मा डोनेट करणार आहे.” पुढील दोन आठवड्यानंतर ती प्लाझ्मा डोनेट करू शकणार आहे. मी कोरोनाच्या पहिल्या लाटे नंतर परदेशात काही प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत. कृपया प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, एकमेकांची काळजी घ्यावी अशी विनंती करतो. प्रेम आणि प्रकाश” अशी भली मोठी पोस्ट करून सुव्रतने त्याच्या तब्येतीची तसेच आगामी प्रोजेक्टची माहिती दिली आहे. आणि चाहत्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन देखील केलं आहे.


हे हि वाचा – कंगनाची टिव टिव बंद ! कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड

- Advertisement -