Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन ठरलं! प्रेक्षकांची आवडती 'देवमाणूस' मालिका घेणार लवकरचं निरोप

ठरलं! प्रेक्षकांची आवडती ‘देवमाणूस’ मालिका घेणार लवकरचं निरोप

Related Story

- Advertisement -

मराठीतील देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे. दररोज नवनव्या पात्रांच्या एंट्रीमुळे ही मालिका अधिकचं रंजक वळणावर पोहचली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही देवमाणूस मालिका अधिकचं लोकप्रिय झाली आहे. मालिकेप्रमाणेचं यातील कलाकारसुद्धा प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवले आहे. त्यामुळे अल्पावधीतचं देवमाणूस मालिकेने टीआरपीचे रेकॉर्ड ब्रेक केले. मात्र आता ही मालिका लवकरचं प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

देवमाणूस मालिकाही बंद होणार असल्याच्या चर्चांमुळे आता चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र या मालिकेत सध्या वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मालिकेतील डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग यांची अकरा खुनांच्या आरोपातून निर्दोष मुक्तता होते. कोर्टात अजितकुमार आर्या या वकिलाविरुद्ध आपली बाजू अत्यंत निर्भीडपणे मांडत आपण देवीसिंग नसून डॉ. अजितकुमार देव असल्याचे साऱ्यांना पटवून देतो. अशातच मालिकेत चंदाची एन्ट्री होते. चंदाचा चेहरा पाहून अजितकुमार बेशुद्ध पडतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

- Advertisement -

कारण चंदामुळे लवकरचं अजितकुमारचा खरा चेहरा सर्वांसमोर येणार असे म्हटले जात आहे. अजितकुमार घरी परतल्यावर डिम्पीसोबत त्याचं लग्न उरकण्याची घाई घरची मंडळी करत आहेत. मात्र दुसरीकडे चंदाच्या एंट्रीमुळे अजितकुमारची घाबरगुंडी उडाली आहे. ही मालिका ऑगस्ट महिन्यात एक्झिट घेणार आहे. परंतु मालिकेचा शेवट नेमका काय होते हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

- Advertisement -

सध्या ‘देवमाणूस’ ही मालिका रात्री साडेदहाच्या स्लॉटमध्ये टीआरपीत अव्वल असल्याचं बोललं जातं. अस असतानाही देवमाणूस मालिकेच्या जागी १६ ऑगस्टपासून एक नवी मालिका प्रदर्शित होणार आहे. या मालिकचे नाव ‘ती परत आलीये’ असं आहे.


HSC Result 2021 : मुसळधार पावसामुळे यंदा १२ वीच्या निकालास होणार उशीर?


 

- Advertisement -