घरमनोरंजनफर्जंद, फत्तेशिकस्त नंतर दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शेर शिवराज है' प्रेक्षकांच्या भेटीला

फर्जंद, फत्तेशिकस्त नंतर दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शेर शिवराज है’ प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

उत्तम मानसशास्त्र जाणणारा रणनीतीज्ञ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळेच रूप 'शेर शिवराज है' या चित्रपटात सादर करण्याचा प्रयत्न दिग्पाल करणार आहे.

लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर शिवचरित्रातील एक नवा अध्याय उलगडण्यासाठी सज्ज झाला आहे. शेर शिवराज हा नवा सिनेमा दिग्पाल लांजेकर प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील वेगवेगळे टप्पे सिनेमाच्या रुपाने प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ या दमदार सिनेमांमुळे दिग्पाल लांजेकर कडून प्रेक्षकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. मराठी सिनेसृष्टीला एक अप्रतिम सिनेमा देण्यासाठी दिग्पाल लांजेकरने या सिनेमासाठी खूप अभ्यास आणि रिसर्च केला आहे. उत्तम मानसशास्त्र जाणणारा रणनीतीज्ञ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळेच रूप ‘शेर शिवराज है’ या चित्रपटात सादर करण्याचा प्रयत्न दिग्पाल करणार आहे.

महाराजांच्या इतिहासातील अफझलखान वधाची घटना सर्वांनाच माहिती आहे. ही घटना युद्धाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जगभरातील बऱ्याच देशांच्या सैन्य दल अभ्यासक्रमांमध्ये अफझलखान वध प्रकरणाचा समावेश आहे. यातील शिवरायांच्या रणनीतीचे प्रशिक्षण सैनिकांना दिले जाते. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फत्तेशिकस्त’ हा सिनेमा मराठा लाईट इन्फंट्री, बेळगाव रेजिमेंटच्या ट्रेनिंग सेंटरने अर्काइव्ह करण्याची प्रोसेस केल्यानंतर सैन्यातील बऱ्याच अधिकाऱ्यांशी दिग्पालचा संपर्क आला. शिवराज अष्टक ही आठ चित्रपटांची मालिका दिग्पाल सादर करणार आहे, यातील ‘शेर शिवराज है’ हा सिनेमा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

- Advertisement -

शिवाजी महाराजांचा कनवाळू, श्रद्धाळू रुप सिनेमातून पाहता येणार आहे. त्याचबरोबर महाराजांचे उत्तम भौगोलिक ज्ञानही सिनेमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या सिनेमाची पटकथा लिहून पूर्ण झाली आहे. सिनेमाची निर्मिती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. दिग्पाल सध्या ‘शेर शिवराज है’ सिनेमाचे पहिले पोस्टर व टीझरही लवकरच रसिकांच्या भेटीला आणण्याच्या तयारीत आहे.


हेही वाचा – Happy Birthday Jiah Khan: वयाच्या २५व्या वर्षी जियाने संपवले आयुष्य, मृत्यूचं गूढ आजही कायम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -