घरमनोरंजनरंग उधळायला मावशी येतेय

रंग उधळायला मावशी येतेय

Subscribe

मालिका, चित्रपटात दिसलेला भरत जाधव सध्या पूर्णपणे सच्चा रंगकर्मी झालेला आहे. सही रे सही, वन्स मोअर ही त्याची नाटके सध्या व्यावसायिक रंगमंचावर सुरु आहेत. अशा यशस्वी घोडदौडीमध्ये मोरुची मावशी हे नाटक व्यावसायिक रंगमंचावर येत आहे. मावशीच्या रुपात आपण रंगमंचावर यावे अशी त्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. लवकरच रंगपंचमी हा उत्सव येत आहे. त्यानिमित्ताने हास्याचे रंग उधळण्यासाठी ही मावशी रंगमंचावर दाखल होत आहे.
यापूर्वी अनेक कलाकारांनी ही मावशी रंगमंचावर साकार केलेली आहे. पण खर्‍या अर्थाने ही भूमिका अजरामर केली ती विजय चव्हाण यांनी. सुधीर भट यांनी दोनवेळा या नाटकाची निर्मिती केली होती. दोन्हीवेळी विजय चव्हाण हे त्यात मावशी साकारत होते. पुढे याच दरम्यान सतीश तारेंनीसुद्धा ही मावशी साकार केली होती. विजयच्या पुरस्काराचे निमित्त घेऊन ज्या अजरामर कलाकृती सादर केल्या त्यात भारतने मावशी साकार केली होती आणि आता ती पूर्णपणे दोन अंकात दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -