Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन 'अजूनही बरसात आहे' मालिकेतून मुक्ता आणि उमेशची छोट्या पडद्यावर एन्ट्री

‘अजूनही बरसात आहे’ मालिकेतून मुक्ता आणि उमेशची छोट्या पडद्यावर एन्ट्री

Related Story

- Advertisement -

मराठी सिनेसृष्टीत आजवर अनेक हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता उमेश कामत आता एकत्र छोट्या पडद्यावर एन्ट्री घेण्यास सज्ज झाले आहेत. ‘अजूनही बरसात आहे’ या नव्या कोऱ्या मालिकेतून मुक्ता आणि उमेशची जोडी प्रेक्षकांना पाहयला मिळणार आहे. मुक्ता बर्वे आणि उमेश कामत या मालिकेत मुख्य भूमिकांत दिसणार आहेत.

मुंबई-पुणे-मुंबई, डबल सीट, जोगवा या आणि अशा अनेक दर्जेदार चित्रपटांद्वारे, सहजसुंदर अभिनयामुळे मुक्ता बर्वे महाराष्ट्राच्या घराघरांत पोचली. उमेश कामत हा तर तरुणींच्या गळ्यातला ताईतच. त्यानीही टाईम प्लिज, लग्न पाहावे करून अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

- Advertisement -

चित्रपटांबरोबरच नाटक माध्यमातूनही उमेश आणि मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मुक्ता आणि उमेश यांनी लग्न पाहावे करून या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. तब्बल ८ वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

एवढंच नाही तर उमेश सात वर्षांनंतर छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. मालिकेच्या नावातून आणि जाहिरात पाहून ही एक प्रेमकथा आहे असं वाटतंय. थोडी खुसखुशीत आणि अनेक रंगांनी भरलेली मीरा आणि आदी यांची ही प्रेमकथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही.


Today Petrol Diesel price : देशात गेल्या ३७ दिवसांत पेट्रोल- डिझेलच्या किंमतींनी गाठला उच्चांक


- Advertisement -

 

- Advertisement -