वैभव तत्ववादीच्या ‘ग्रे’ला प्रेक्षकांची विशेष पसंती!

वैभव तत्ववादी

अभिषेक जावकर दिग्दर्शित आणि रेड बल्ब मूव्हीज, का का किंडल एंटरटेनमेंट निर्मित ग्रे हा मराठी चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. १ ऑक्टोबर रोजी झी ५ अॅप्लिकेशनववर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. रहस्यमय, थरारक आणि वेगळ्या धाटणीच्या असलेल्या मराठी चित्रपटाच्या विषयामुळे ग्रे चित्रपटाचे प्रेक्षकांकडून कौतुक केले जात आहे, यासह या चित्रपटास पसंती देखील मिळत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अल्पावधीत लाडका बनलेला अभिनेता वैभव तत्ववादी ‘ग्रे’ चित्रपटात मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. या चित्रपटात तो ‘सिद्धांत’ नावाच्या प्रामाणिक पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांच्या अमेरिकेतून परतणाऱ्या मुलाची भूमिका साकारत आहे. ‘सिद्धांत’च्या कुटुंबाच्या दुर्दैवी बदल्याची ग्रे या चित्रपटाची कथा आहे. वैभव तत्ववादीने बरेच मराठी चित्रपट केले मात्र ग्रे चित्रपटात त्याने केलेला अभिनय आणि ‘सिद्धांत’ची भूमिका प्रत्येक प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडत आहे.

या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत वैभव तत्ववादीसह पल्लवी पाटील, मयुरी देशमुख, शरद पोंक्षे, अविनाश नारकर, पुष्कराज चिरपूटकर हे कलाकार देखील दिसणार आहेत. अभिषेक जावकर आणि स्पृहा जोशी यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. ग्रे हा चित्रपट प्रेमाची आठवण बनून राहणाऱ्या नात्यांना घातलेली बदल्याची आर्त साद प्रेक्षकांना झी ५ प्रीमियरवर पाहता येणार आहे.