घरमनोरंजनफिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये 'या' कलाकारांनी मारली बाजी

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘या’ कलाकारांनी मारली बाजी

Subscribe

मराठी सिनेसृष्टीत वेध लागलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला असून अनेक मराठी कलाकारांनी याला हजेरी लावली.

प्लॅनेट मराठी फिल्ममफेअर पुरस्कार सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्याला मराठीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. मुंबईतील वांद्रे येथे रविवारी हा पुरस्कार सोहळा पडला.  या कार्यक्रमाला मराठी सिनेसृष्टीचे अनेक दिग्गज कलाकार, गायक, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, एकाच ठिकाणी जमले होते. यात अनेक मराठी चित्रपटांना, कलाकारांना विविध विभागांसाठी पुरस्कार मिळाले. अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधवने आपल्या खास शैलीत या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान तर पटकावलाच पण त्यासोबतच या चित्रपटाला एकूण अजूनही काही पुरस्कार मिळाले आहेत. अभिनेता दिपक डोब्रियाल यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मानही पटकावला. तसेच ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटासाठी मुक्ता बर्वे ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे.या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाने बाजी मारली.

त्यासोबतच या चित्रपटाला एकूण अजूनही काही पुरस्कार मिळाले आहेत.
ते खालीलप्रमाणेः

१. सर्वोत्कृष्ट चित्रपट- आनंदी गोपाळ
२. सर्वोत्कृष्ट अभिनेता(समीक्षक)- ललित प्रभाकर
३.सर्वोत्कृष्ट अभिनेत्री(समीक्षक)- भाग्यश्री मिलिंद
(हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक)- सोनाली कुलकर्णी (हिरकणी)
४. सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम- सौरभ भालेराव, हृषिकेश दातार, जसराज जोशी
५. सर्वोत्कृष्ट पटकथा- करन शर्मा
६. सर्वोत्कृष्ट संवाद- इरावती कर्णिक

- Advertisement -

हे वाचा- महाराष्ट्र पोलिसांना मानाचा मुजरा; जुहू चौपाटीवर साकारलं अनोखं वाळुशिल्प

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -