घरमनोरंजनपुन्हा एकदा मराठी 'करोडपती', सोनी मराठीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुन्हा एकदा मराठी ‘करोडपती’, सोनी मराठीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

हाच कार्यक्रम हिंदीमध्ये सुद्धा मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. आणि त्याचे सूत्रसंचालन जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन करत आहेत. त्यानंतर हा कार्यक्रम मागच्या काही वर्षांपासून मराठीमध्ये सुद्धा केला जात आहे. हिंदीप्रमाणेच मराठी कार्यक्रमालासुद्धा प्रेक्षक मोठा प्रतिसाद देत आहेत.

असे काही कार्यक्रम असतात जे मराठी आणि हिंदी दोन्ही ठिकाणी हिट ठरतात. त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार मराठी करोडपती’. या कार्यक्रमाचं नवं पर्व पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत.

अभिनेते सचिन खेडेकर मुंबई फिल्म सिटीमध्ये ‘कोण होणार मराठी करोडपती’ च्या सेटवर दिसले. या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचे चित्रकरण फिल्म सिटीमध्ये सुरु झाले आहे. लवकरच हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. मराठी करोडपतीच्या पहिल्या पर्वाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर यांनी केले होते. पण त्या नंतरच्या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेता स्वप्नील जोशी आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले. आता पुन्हा सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहेत. हा कार्यक्रम सोनी मराठी या वाहिनीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -

हाच कार्यक्रम हिंदीमध्ये सुद्धा मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. आणि त्याचे सूत्रसंचालन जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन करत आहेत. त्यानंतर हा कार्यक्रम मागच्या काही वर्षांपासून मराठीमध्ये सुद्धा केला जात आहे. हिंदीप्रमाणेच मराठी कार्यक्रमालासुद्धा प्रेक्षक मोठा प्रतिसाद देत आहेत. या कार्यक्रमामध्ये अनेक जण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर येत असतात. त्या दरम्यान काही भावनिक क्षण पाहायला मिळतात. तर काही जण विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन मोठी रक्कमही घेऊन जातात.  मराठी करोडपतीमध्ये अनेक सेलिब्रेटी सुद्धा हजेरी लावत असतात. या नवीन पर्वामध्ये नेमके कोणते क्षण प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. त्याचबरोबर सचिन खेडेकर यांची ओघवती भाषा आणि बोलण्याची उत्तम शैली हा सुद्धा या कार्यक्रमाचा एक महत्वपूर्ण भाग आहे.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -