घरताज्या घडामोडीDarling Movie: मराठी बॅाक्स ऑफिसवर 'डार्लिंग'चा बोलबाला! प्रेक्षकांनी गाण्यांवर धरला ठेका

Darling Movie: मराठी बॅाक्स ऑफिसवर ‘डार्लिंग’चा बोलबाला! प्रेक्षकांनी गाण्यांवर धरला ठेका

Subscribe

दुसऱ्या लॅाकडाऊननंतर सिनेमागृहांचे दरवाजे उघडल्यानंतर शुभशकून देत प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांनंतर ‘डार्लिंग’ या लव्हेबल चित्रपटालाही प्रेक्षकांचा कौल मिळाला आहे. मराठी बॅाक्स ऑफिसवर आज ‘डार्लिंग’चाच बोलबाला आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि रितिका श्रोत्री या ‘टकाटक’ जोडीचा जलवा पुन्हा एकादा डार्लिंग निमित्ताने थिएटरमध्ये पहायला मिळत आहे. रसिक पुन्हा एकदा प्रथमेश-रितिका यांच्या अफलातून केमिस्ट्रीवर फिदा झाले आहेत. ‘डार्लिंग’ या चित्रपटानं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दुसऱ्या लॅाकडाऊननंतर सिनेमागृहांचे दरवाजे उघडल्यानंतर शुभशकून देत प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांनंतर ‘डार्लिंग’ या लव्हेबल चित्रपटालाही प्रेक्षकांचा कौल मिळाला आहे. मराठी बॅाक्स ऑफिसवर आज ‘डार्लिंग’चाच बोलबाला आहे.

डार्लिंग पाहण्यासाठी प्रेक्षकांची तूफान गर्दी

लॅाकडाऊनमुळं प्रेक्षकांच्या भेटीपासून दुरावलेला ‘डार्लिंग’ अखेर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनीही हा चित्रपट डोक्यावर घेतल्याचं चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील काही सिनेमागृहांमध्ये ‘डार्लिंग’च्या गाण्यांवर रसिक अक्षरश: तल्लीन होऊन नाचत असल्याच्या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. २५० हून सिनेमागृहांमध्ये ३००० पेक्षा जास्त स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेला ‘डार्लिंग’ पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. हडपसर, खर्डा, रहाटणी, नारायणगाव, तळेगाव, नाशिक, लातूर, नांदेड, अकलूज, अमरावती, खान्देश, चिंचवड, सोनाई, कामोठे, गोरेगाव, वाळूंज, औरंगाबाद, सिटिप्राईड अभिरूची येथे रविवारी हाऊसफुलचे बोर्ड झळकले.

- Advertisement -

प्रथमेश आणि रितिका यांच्या जोडीला प्रेक्षकांची पुन्हा पसंती

प्रथमेश आणि रितिका यांच्या जोडीला निखिल चव्हाणनं साकारलेला राजभाऊही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक गावातील काही तरुणांचं प्रतिनिधीत्व करणारा असल्यानं तोदेखील लक्ष वेधून घेत आहे. टायटलवरून जरी हा चित्रपट केवळ प्रेमकथा असल्यासारखा वाटत असला तरी मूळात हा फॅमिली एन्टरटेनर असल्यानं प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यात यशस्वी होत आहे. अखेरपर्यंत खिळवून ठेवणारं कथानक, पूर्वार्धात केलेली व्यक्तिरेखा आणि पटकथेची बांधणी, उत्तरार्धात त्याला जोडलेली इमोशनची किनार, तंत्रशुद्ध दिग्दर्शन, कलाकारांचा सशक्त अभिनय, प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी केलेलं अचूक कास्टिंग, सुमधूर संगीत, नेत्रसुखद सिनेमॅटोग्राफी आणि दर्जेदार निर्मितीमूल्ये अशी एक ना अनेक कारणं ‘डार्लिंग’ला चहू बाजूंनी परफेक्ट बनवणारी आहेत.

तरुणाईसोबतच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना ताल धरायला लावण्याची क्षमता ‘डार्लिंग’च्या गाण्यांमध्ये असल्याचं चित्र महाराष्ट्रभर पहायला मिळत आहे. चित्रपटातील कलाकारांनी महाराष्ट्रातील महत्त्वाचे जिल्हे आणि शहरांमध्ये जाऊन प्रमोशन करताना केलेल्या आवाहनाला रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यानं ५० टक्के आसनक्षमता असूनही अफलातून प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘माझा होशील ना’ नंतर अभिनेता विराजस कुलकर्णीचं दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -