घरमनोरंजनयंदाच्या इफ्फी फेस्टिव्हलमध्ये मराठमोळ्या 'प्रवास'ची बाजी

यंदाच्या इफ्फी फेस्टिव्हलमध्ये मराठमोळ्या ‘प्रवास’ची बाजी

Subscribe

अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांनी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता इफ्फी फेस्टिव्हलमध्ये प्रवास आपला वेगळा ठसा उमटवेल असा विश्वास आहे.

सिनेमासृष्टीत मानाचा समजला जाणारा सर्वात मोठी सोहळा म्हणजे इफ्फी. इफ्फी म्हणजेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया. यंदाच्या ५१व्या इफ्फी फेस्टिव्हलमध्ये मराठी चित्रपटाने मान पटकवला आहे. इफ्फी चित्रपट महोत्सवामध्ये इंडियन पॅनारोमा फिचर फिल्म २०२० च्या विभागात प्रवास या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. शशांक उदापूरकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शित केला आहे. त्याचप्रमाणे अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापूरे यांच्या अभिनयाने नटलेल्या ‘प्रवास’ या चित्रपटाची निवड झाली आहे.

प्रवासची निवड इफ्फी या मानाच्या महोत्सवात होणे ही आमच्यासाठी बहुमानाची गोष्ट असल्याचे या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक शशांक उदापूरकर यांनी सांगितले. अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांनी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता इफ्फी फेस्टिव्हलमध्ये प्रवास आपला वेगळा ठसा उमटवेल असा विश्वास चित्रपटाचे निर्माते ओम छंगानी यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

आयुष्यातील प्रत्येक लढाई निर्धाराने लढण्यातच खरी मजा असते असा आशय मांडणारा हा चित्रपट होता. ओम छंगानी फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. अशोक सराफ व पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत या चित्रपटात विक्रम गोखले, रजत कपूर, शशांक उदापूरकर या कलाकांरांचा दमगार अभिनय या सिनेमात पहायला मिळाला होता. यंदाच्या इफ्फी फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाची निवड झाल्याने चित्रपटाला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


हेही वाचा – शेवंताचे पाटणकर येतायत ‘नेलपॉलिश’ घेऊन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -