घरमनोरंजन'विशू' या आगामी चित्रपटातून झळकणार अनोखी प्रेमकथा

‘विशू’ या आगामी चित्रपटातून झळकणार अनोखी प्रेमकथा

Subscribe

आपल्याचं विश्वात रमणाऱ्या या दोनही पात्रांची अनोखी प्रेमकथा आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने गश्मीर आणि मृण्मयी पहिल्यांदाचं एकत्र काम करणार आहेत.

‘विशू’ हा नवा आगामी  मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांनी केलं असून, या चित्रपटात गश्मीर महाजनी आणि मृण्मयी गोडबोले हे मुख्य भूमिकेत दिसून येतील. विशू या चित्रपटात आपल्याला एक गोड प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. ज्याची सुरुवात निसर्गरम्य अशा कोकणातून होते. काही दिवसांपूर्वीचं या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर झळकले होते, समुद्राच्या लाटांबरोबर खेळणाऱ्या विशूला म्हणजेच गश्मीरला पाहून प्रेक्षकांना चित्रपटविषयक आकर्षण निर्माण झाले. आता या चित्रपटाचे दुसरे पोस्टरसुद्धा समोर आले असून, यामध्ये गश्मीरसह मृण्मयी गोडबोले दिसत आहे.

आपल्याचं विश्वात रमणाऱ्या या दोन्ही पात्रांची अनोखी प्रेमकथा आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने गश्मीर आणि मृण्मयी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे या चित्रपटाबाबत म्हणतात की, “हा एक कौटुंबिक चित्रपट असून, यामध्ये एक गोड प्रेमकथा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाविषयी मी जास्त काही बोलणार नाही फक्त एकच सांगेन की, काही गोष्टींची जाणीव आणि सकारात्मकता देणारा हा चित्रपट आहे.”

- Advertisement -

या चित्रपटात गश्मीर आणि मृण्मयीसोबत ऐतेशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकर हेसुद्धा मुख्य भूमिकेत दिसून येतील, 8 मार्चला हा चित्रपट रिलीज होणार आहे. श्रीकृपा प्रोडक्शनचा ‘विशू’ हा दुसरा चित्रपट असून, येत्या काळात श्रीकृपा प्रॅाडक्शनचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती बाबू कृष्णा भोईर यांनी केली असून, मयूर मधुकर शिंदे यांनी ‘विशू’चे कथालेखन केले. ऋषिकेश कोळी यांनी चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. तसेच ‘विशू’ला ऋषिकेश कामेरकर यांचे मधुर संगीत दिले असून, या संगीताला मंगेश कांगणे यांचा आवाज लाभला आहे.


हेही वाचा : Jhund : …अन् त्यानंतर अमिताभ बच्चन झुंडमध्ये काम करण्यास तयार झाले, वाचा काय म्हणाले बिग बी?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -