घरमनोरंजनविदर्भीय गावाची गोष्ट ‘झांगडगुत्ता’ सिनेमात

विदर्भीय गावाची गोष्ट ‘झांगडगुत्ता’ सिनेमात

Subscribe

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे त्यातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या घरात पोहोचला. कॅप्टन ऑफ दि शिप निलेश साबळे, कुशल बद्रीके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे या सहा जणांनी आपल्या विनोदाच्या शैलीने अल्पावधीतच प्रेक्षकांना आपलंसं केलं.

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे त्यातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या घरात पोहोचला. कॅप्टन ऑफ दि शिप निलेश साबळे, कुशल बद्रीके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे या सहा जणांनी आपल्या विनोदाच्या शैलीने अल्पावधीतच प्रेक्षकांना आपलंसं केलं. या सगळ्यांचीच आपली एक स्वत:ची वेगळी शैली आहे. भारत गणेशपुरे यांची विदर्भाची भाषा असो वा सागर कारंडे याने साकारलेली पुणेरी बाई असो. सगळ्याच भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या दोघांना एकत्र एका मराठी चित्रपटात बघण्याची संधी आता प्रेक्षकांना मिळणार आहे. लवकरच संदीप नवरे दिग्दर्शित ‘झांगडगुत्ता’ या मराठी चित्रपटात ही जोडी झळकणार आहे.

‘झांगडगुत्ता’ हा विदर्भातील शब्द आहे. त्याला सावळा गोंधळ असं आपण म्हणू शकतो. सिनेमाची गोष्ट ही विदर्भातील एका छोट्या गावात घडते. सागर हा उपवर मुलगा आहे तर भारत त्याचे वडील आहेत. अनेक वर्षांपासून प्रयत्न करून देखील सागरच्या लग्नाचे कुठेच काही ठरत नाही. विदर्भीय प्रश्नाचे मिश्कीलपणे पण प्रश्नाचे गांभीर्य न सोडता केलेला प्रयत्न म्हणजे ‘झांगडगुत्ता’.

मला आणि सागरला एकत्र आणण्यासाठी दिग्दर्शकाने खूप वाट पाहिली. याचे मला खूप कौतुक वाटते. आम्ही आज नायक नसलो तरीदेखील प्रेक्षक आमच्यावर प्रेम करतात आणि विशेष म्हणजे निर्माते आणि दिग्दर्शक आमच्यासाठी थांबून राहतात यासाठी निर्माते आणि दिग्दर्शक यांचे खूप खूप आभार.
– भारत गणेशपुरे, अभिनेता

झांगडगुत्ता… म्हणजे गडबड गोंधळ, अनेकांच्या गोंधळात माझा पण एक गोंधळ आहे. यात माझी खूप वेगळी भूमिका आहे, आजवर मी अशी भूमिका यापूर्वी कधीच केली नाही. या भूमिकेसाठी मला सतत एका माणसाला भेटून अभ्यास करावा लागला. ते नेमकं काय आहे ते तुम्हाला लवकरच समजेल. मला खात्री आहे की विनोदाचा हा झांगडगुत्ता मराठी प्रेक्षक नक्कीच डोक्यावर घेतील.
– सागर कारंडे, अभिनेता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -