घरमनोरंजनगंभीर विषय विनोदी ढंगाने नाट्यप्रेमींच्या भेटीला

गंभीर विषय विनोदी ढंगाने नाट्यप्रेमींच्या भेटीला

Subscribe

नाटककार आनंद म्हसवेकर हे गेली अनेक वर्षे एकांकिका, हौशी तसेच व्यावसायिक रंगभूमीवर लेखक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून कार्यरत आहेत. आता त्यांचे २२ वे नवे कोरे व्यावसायिक नाटक रंगभूमीवर येत आहे. ‘तेरा दिवस प्रेमाचे’ हे नाटक गुरुवार, १६ ऑगस्टपासून रंगभूमीवर दाखल होत आहे.

नाटककार आनंद म्हसवेकर हे गेली अनेक वर्षे एकांकिका, हौशी तसेच व्यावसायिक रंगभूमीवर लेखक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून कार्यरत आहेत. आता त्यांचे २२ वे नवे कोरे व्यावसायिक नाटक रंगभूमीवर येत आहे. ‘तेरा दिवस प्रेमाचे’ हे नाटक गुरुवार, १६ ऑगस्टपासून रंगभूमीवर दाखल होत आहे. आनंद म्हसवेकर यांनी आतापर्यंत गंभीर तसेच विनोदी बाजाची विविध नाट्यकलाकृती लिहिल्या आहेत. मात्र ‘तेरा दिवस प्रेमाचे’ या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे, एक गंभीर विषय त्यांनी विनोदी पद्धतीने यात मांडला असून मनोरंजन आणि गंभीर प्रवृत्ती याची अनोखी सांगड त्यांनी नाटकात घातली आहे.

या नाटकाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे पुन्हा एकदा रंगभूमीवर येत असून, हे या नाटकाचे खास वैशिष्ट्य ठरणार आहे. ‘तेरा दिवस प्रेमाचे’ या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग सलग सहा दिवस रंगणार आहेत. १६ ऑगस्ट २०१८ रोजी, रात्री ८ वाजता शिवाजी मंदिर येथे या नाटकाचा शुभारंभ होणार असून त्यानंतर सावित्रीबाई फुले नाट्यगृह (१७ ऑगस्ट), गडकरी रंगायतन (१८ ऑगस्ट), कालिदास नाट्यगृह (१९ ऑगस्ट), प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह (२० ऑगस्ट) आणि २१ ऑगस्ट रोजी पुन्हा शिवाजी मंदिर असे हे सहा दिवस सलग प्रयोग होत आहेत. त्यामुळे नाट्यरसिकांना याचा वेळेनुसार आनंद घेता येणार आहे.

- Advertisement -

शिरीष राणे हे या नाटकाचे दिग्दर्शक असून अनुराधा सामंत या नाटकाच्या निर्मात्या आहेत. संदेश बेंद्रे यांनी नाटकाच्या नेपथ्याची जबाबदारी सांभाळली आहे. तर मयुरेश माडगांवकर यांचे पार्श्वसंगीत, विनय आनंद यांची प्रकाशयोजना या नाटकाला असणार आहे. कार्यकारी निर्माता म्हणून विनय म्हसवेकर हे आहेत. अरुण नलावडे यांच्यासह माधवी दाभोळकर, संजय क्षेमकल्याणी, शर्वरी गायकवाड, मेघना साने, देवेश काळे आणि संजय देशपांडे हे कलाकार या नाटकात विविध भूमिका साकारताना दिसणार आहेत.

अनेक दिवस मी रंगभूमीपासून दूर होतो. ‘तेरा दिवस प्रेमाचे’ या नाटकाशिवाय आणखी चांगली संहीता मला मिळाली नसती. त्यामुळे लगेचच हे नाटक करण्याचा निर्णय घेतला. या नाटकात माणसात असणार्‍या प्रत्येक प्रवृत्ती तुम्हाला पाहायला मिळतील. नाटक पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, की अशीही माणसं वागू शकतात. ‘तेरा दिवस प्रेमाचे’ या नावातच गंमत आहे. नाटकाचा विषय जरी गंभीर असला तरी विनोदी अंगाने मांडण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हे नाटक नक्की आवडेल यात शंका नाही.
– अरुण नलावडे, अभिनेते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -