घरमनोरंजननिरागस मायराचा मोठा चाहता! रंगोळीतून रेखाटलं परीचं सुंदर चित्र

निरागस मायराचा मोठा चाहता! रंगोळीतून रेखाटलं परीचं सुंदर चित्र

Subscribe

मराठी टेलिव्हिजनवर सध्या माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सध्या जोरदार चर्चा आहे. या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून लोकप्रिय मालिकांच्या यादीत ही मालिका प्रथम स्थानकावर पोहचली आहे. त्यामुळे चाहत्यांना ही मालिका पसंतीस पडली आहे. मालिकेतील श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या दिग्गज कलाकारांसोबतच परी म्हणजेच मायरा वैकुळ ही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)


इतकंच नव्हे तर ती महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची लाडकी बनली असून ते तिच्यावर प्रेमाचा अक्षरशः वर्षाव करत आहेत. मालिका सुरु व्हायच्या आधी पासूनच मायराचा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. ‘आहे परी तर डोन्ट वरी’ असं म्हणत आपल्या निरागस अभिनयाने मायराने प्रेक्षकांचं टेन्शन दूर करत त्यांच्या मनात एक अढळ स्थान बनवलं आहे.

- Advertisement -

मालिकेतील परीचा निरागसपणा प्रेक्षकांना भावतोय. परी ही सगळ्यांना आपल्यातलीच एक वाटते आणि तिचे चाहते तिच्यावरील प्रेम वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतात. नुकतंच अशाच एका चाहत्याने मायराची गणपती बाप्पासोबत थ्रीडी रांगोळी काढली. ओमकार नलावडे या कलाकाराने कलेच्या अधिपतीला कलेतून वंदन केलं. ही रांगोळी मायरा इतकीच गोड आणि सुंदर आहे. या रांगोळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाहिनीने पोस्ट केला असून त्यावर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळतोय. यावरून प्रेक्षकांचं मालिकेवर आणि त्यांच्या लाडक्या परीवर असलेलं प्रेम दिसून येतं.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -