घरमनोरंजन'तुला पाहते रे' मालिकेवर इराकी प्रेक्षकही फिदा!

‘तुला पाहते रे’ मालिकेवर इराकी प्रेक्षकही फिदा!

Subscribe

'झी मराठी' वाहिनीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रियतेत अव्वल ठरली. या मालिकेला ईराकहून शुभेच्छा आल्या आहेत.

प्रत्येक मालिकेचा एक युएसपी असतो. त्यामुळे ती मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करते. त्याचप्रमाणे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रियतेत अव्वल ठरली. आज बधवारी ५ डिसेंबरला या मालिकेचे १०० भाग पूर्ण होत आहेत. या मालिकेचे केवळ महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर परदेशातही चाहते आहेत. हे अतिशयोक्ती नाही तर खुद्द अभिनेता सुबोध भावेने ट्वीट करत या विषयी माहिती दिली आहे. त्यानिमित्ताने इराकमधील एका मुलीने मालिकेच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – ही व्यक्तीरेखा साकारणं आव्हानच- जुई गडकरी

- Advertisement -

काय म्हणाला सुबोध भावे?

तुला पाहते रे या मालिकेतील मुख्य पात्र विक्रांत सरंजामे म्हणजेच अभिनेता सुबोध भावे याने केलेल्या ट्वीटमध्ये चक्क इराकमधील एका मुलीने शंभराव्या भागासाठी मालिकेला आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे मालिकेचे चाहते परदेशातही आहेत हे नक्की. सुबोधने हा व्हिडिओ ट्वीट करत लिहीले आहे की, आज मालिकेचा शंभरावा भाग प्रदर्शित होणार आहे आणि त्यानिमित्ताने थेट इराकवरून शुभेच्छा आल्या आहेत. त्याचबरोबर त्याने त्या मुलीचा व्हीडीओ देखील शेअर केला आहे. या मुलीने दिलेल्या शुभेच्छांमुळे सुबोध भावे भारावला आहे. तिला उत्तर देताना तो म्हणतो, भारताबाहेरही मालिका प्रेक्षकांना आवडते आहे, याचा विशेष आनंद आहे. सर्व इराकी लोकांना नमस्कार आणि खूप सारे प्रेम. या मुलीने व्हीडीओमध्ये म्हटलं आहे की, आज तुला पाहते रे या मालिकेचा शंभरावा भाग पुर्ण होत आहे. त्यामुळे मालिकेतील विक्रांत सरंजामे आणि ईशाला, मायराला तसेच संपूर्ण टीमला माझ्याकडून शुभेच्छा.


हेही वाचा – स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेने सांगितले धम्माल किस्से

- Advertisement -

मालिका बंद करण्याचा सूर

काही दिवसांपूर्वी ही मालिका बंद करा अशी मागणी करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी मालिका बंद करण्याबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं. ‘तुला पाहते रे’ मालिकेतून कोणताच सामाजिक किंवा प्रबोधनात्मक संदेश दिला जात नसून, महाराष्ट्राची संस्कृती बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नाईक यांनी केला होता. ‘ज्या मालिकेमध्ये २० वर्षांची मुलगी चाळीशीच्या माणसाच्या प्रेमात पडल्याचं दाखवलं जातं, अशी मालिका जिजाऊंची शिकवण असलेल्या महाराष्ट्रासाठी घातक आहे’, असं नाईक यांनी आपल्या निवेदनात म्हटलं होतं. नाईक यांनी सांगतले होते की, या मालिकेद्वारे आमच्या माता-भगिनींनी चुकीचा संदेश दिला जात असून, याविषयी आम्ही संबंधित वाहिनीकडे फोनवरुन तक्रार नोंदवली आहे. मात्र, ईमेल करा असं सांगून आम्हाला धुडकावून लावल्याचा आरोप नाईक यांनी केला.


हेही वाचा – शाहरुख-सलमानचं ‘इश्कबाजी’ गाणं लाँच!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -