घरमनोरंजनमराठी मालिकांचेही चित्रिकरण आता महाराष्ट्राबाहेर, 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेचे चित्रिकरण राज्याबाहेर होणार

मराठी मालिकांचेही चित्रिकरण आता महाराष्ट्राबाहेर, ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचे चित्रिकरण राज्याबाहेर होणार

Subscribe

मालिकेने सुद्धा परराज्यात शूटिंग करण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसतेय यासाठी संपूर्ण टिम दुसर्‍या राज्यात दाखल झाली आहे.

जगभरामध्ये कोरोना पुन्हा डोके वर काढत. अत्यंत बिकट परिस्थिती जागोजागी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. तसेच रुग्णसंख्येत झपाटयाने वाढ होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कडक लॉक डाऊन लागू केलं आहे. अशातच चित्रपट,मालिकांच्या चित्रिकरणास सुद्धा पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनात कोणताही खंड पडू नये तसेच चित्रिकरण सुरळीत चालू राहावे यासाठी अनेक मालिकांनी महाराष्ट्राबाहेर चित्रिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टार प्रवाह वरील सुप्रसिद्ध मालिका ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेने सुद्धा परराज्यात शूटिंग करण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी संपूर्ण टिम दुसर्‍या राज्यात दाखल झाली आहे. मालिकेमधील मुख्य अभिनेत्री समृद्धी केळकर तसेच अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर एयरपोर्ट वरचे फोटो शेअर केले आहेत. मालिकेचे चित्रीकरणासाठी संपूर्ण टीम गुजरातमध्ये दाखल झाली आहे.त्यामुळे आता पुढील चित्रीकरण गुजरात मध्ये होणार आहे.


कोरोनामुळे चित्रपटसृष्टीला उतरती कळा लागली आहे. गेल्यावर्षी झालेल्या महामारीमुळे सर्वात मोठा फटका हा सिनेसृष्टीला बसला होता. चित्रीकरण बंद असल्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानचा सामना चित्रपटसृष्टीला करावा लागला. पुन्हा अशी परिस्थिती ओढाव्यल्यामुळे चित्रीकरण थांबू नये म्हणून अनेक मालिकांचे शूटिंग हैदराबाद मधील रामोजी फिल्म सिटि येथे सुरू आहे. आता यात मराठी मालिकांनी सुद्धा राज्याबाहेर जाऊन चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – वजनावरून ट्रोल करणार्‍या नेटकर्‍यांवर भडकली धनश्री काडगावकर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -