चला आपल्यातलं अंतर कमी करूयात कारण, ‘ते आपल्यातले’ आहेत…

Marathi Shortfilm Te Aaplyatle

आजही सर एखादा तृतीयपंथी समोर आला तर अनेकजण नाकं मुरडतात. याच समाजाचा ते एक भाग असूनही त्यांना तो दर्जा मिळत नाही. त्यामुळे त्यांचं दु:ख, त्यांची तळमळ आणि एक व्यक्ती म्हणून त्यांनी केलेली धडपड हे सारं ‘ते आपल्यातले’ या लघुपटातून मांडण्यात आलं आहे.

सध्या देशावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे वारंवार सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासून समाजातील अनेक जण एका वर्गांपासून सामाजिक अंतर बाळगून आहेत. तो समाज म्हणजे तृतीयपंथी. बऱ्याच वेळा तृतीयपंथीयांना डावललं जातं. पण ही शॉर्टफिल्म नक्कीच समाजाच परिवर्तन करेल.

या लघुपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण कमळे यांनी केलं आहे. तर निर्मिती विघ्नेश जयस्वाल यांनी केली आहे. विशेष म्हणजे या लघुपटात एका खऱ्याखुऱ्या तृतीयपंथी व्यक्तीने काम केलं आहे. विनी चौधरी असं तिचं नाव असून ती मुख्य भूमिकेत झळकली आहे. मिनी मूळ वरळी येथील रहिवासी आहेत.  प्रवीण कमळे यांनी यापूर्वी ‘दगडी चाळ’ या चित्रपटासाठी संवाद लेखन केलं आहे तर यापूर्वी ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटाचं सह-दिग्दर्शनही केलं आहे.


हे ही वाचा – गर्लफ्रेंडची हत्या लपवण्यासाठी त्याने केले आणखी ९ खून!