घरमनोरंजन‘रानबाजार’चा ट्रेलर प्रदर्शित; 20 मेपासून प्लॅनेट मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला

‘रानबाजार’चा ट्रेलर प्रदर्शित; 20 मेपासून प्लॅनेट मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून बहुप्रतिक्षित अभिजित पानसे लिखीत, दिग्दर्शित ‘रानबाजार’ वेबसीरिजची चर्चा सुरु आहे. मराठीमधील ही सगळ्यात बोल्ड सीरिज असल्याचं मानलं जात असून, या सीरिजचा टीझर, पोस्टर प्रदर्शित होताच लाखो प्रेक्षकांनी त्याला पसंती दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून बहुप्रतिक्षित अभिजित पानसे लिखीत, दिग्दर्शित ‘रानबाजार’ वेबसीरिजची चर्चा सुरु आहे. मराठीमधील ही सगळ्यात बोल्ड सीरिज असल्याचं मानलं जात असून, या सीरिजचा टीझर, पोस्टर प्रदर्शित होताच लाखो प्रेक्षकांनी त्याला पसंती दिली. त्यानंतर प्रेक्षकांना ‘रानबाजार’च्या ट्रेलरची प्रतिक्षा होती. मात्र, आज या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. विशेष म्हणजे हा ट्रेलर प्रदर्शित होताच काही मिनिटांमध्येच 10 हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.

‘रानबाजार’च्या टिझरमधून तेजस्विनी पंडीत आणि प्राजक्ता माळीचा थक्क करणारा मादक अंदाज प्रेक्षकांनी नुकताच अनुभवला आहे. पॅलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी, रावण फ्युचर प्रॅाडक्शन, अभिजीत पानसे आणि अनिता पालांडे यांनी केली असून ही भव्य वेबसीरिज 20 मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजवर कधीही न पाहिलेले राजकारण, त्यातील धूर्त डावपेच, हनी ट्रॅप, उत्कंठा, नाट्यमय थरार हे सगळंच ट्रेलरमध्ये दिसत आहे. त्यामुळे ‘रानबाजार’ची उत्सुकता आता अधिकच शिगेला पोहोचली आहे. आजवरच्या वेबविश्वात कदाचित कधीही न पाहिलेली कथा या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

या ट्रेलरमधून यातील इतर चेहरेही आता समोर आले आहेत. यात उर्मिला कोठारे, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, वैभव मांगले, अनंत जोग, सुरेखा कुडची, अभिजित पानसे, गिरीष दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात आणि माधुरी पवार यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

- Advertisement -

“टिझरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी टिझरने लाखो व्ह्युजचा टप्पा पार केला असून ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे प्रेक्षक आता वेबसीरिज प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. ही वेबसीरिज पाहताना प्रेक्षकांच्या मनात असं काहीसं घडलं होतं, कदाचित, असा विचार आल्याशिवाय राहणार नाही. राजकारणाभोवती फिरणारी ही कथा असली त्याच्याशी जोडल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, ज्या कल्पनेपलीकडच्या आहेत. हेच गूढ ‘रानबाजार’मध्ये उलगडणार आहे.”, असे ‘रानबाजार’चे दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी म्हटले.

“अभिजित पानसे यांचा चित्रपट म्हणजे काहीतरी हटके असणार, हा एक नियमच आहे आणि आता तर त्यांनी वेबविश्वात पदार्पण केले आहे. त्यांच्या पहिल्याच ‘रानबाजार’ या वेबसीरिजने वेबविश्व हादरून टाकले आहे. असा विषय आजवरच्या वेबविश्वात कोणीही हाताळला नसेल. या वेबसीरिजची भव्यता आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. प्लॅनेट मराठीने आपला प्रेक्षक केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित न ठेवता, अवघ्या जगभरातील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचेही प्लॅनेट मराठीचे ध्येय आहे. त्यामुळेच प्रेक्षकांना तितक्या उच्च दर्जाचा आशय देण्यास आम्ही बांधिल आहोत. ‘रानबाजार’ ही त्याच दर्जाची वेबसीरिज आहे. राजकारणाभोवती फिरणाऱ्या या ‘रानबाजारा’तील गुपिते यानिमित्ताने समोर येणार आहेत.”, असे प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापुरकर यांनी म्हटले.


हेही वाचा – Malaika Arjun Wedding : मलायका अरोरा-अर्जुन कपूर लवकरच अडकणार लग्नबंधनात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -