घरमनोरंजनप्लीज रोटी दे

प्लीज रोटी दे

Subscribe

मला वाटते असा कोणताही दिवस शिल्लक राहिलेला नाही जो कोणता तरी डे म्हणून साजरा केला जात नाही. जागतिक पातळीबरोबर राज्यातल्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय नेत्यांनी हे दिवस वाटून घेतलेले आहेत. त्यामुळे भविष्यात बहुदा आठवड्यातल्या या डेंना एकत्रित आणून वेगळा उपक्रम राबवण्याची गरज वाटणार आहे. ज्यात सामाजिक भान आहे अशा दिवसाचे संवेदनशील माणसांकडून स्वागत होते. 1 मार्च हा रोटी डे म्हणून साजरा केला जातो. अन्नापासून वंचित असलेल्या भुकेलेल्या माणसाला त्यादिवशी भीक न मागता रोटी देता येईल का असा विचार या रोटी डे मध्ये आहे. सांगायला हा रोटी डे असला तरी तो सर्वच संस्थांकडून राबविला जातो असे नाही, परंतु यासंदर्भात जनजागृती केली आणि त्यात सेलिब्रिटी कलाकारांनी पुढाकार घेतला तर भविष्यात या डेचे महत्त्व वाढेल या एका उद्देशाने लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता अशोक समेळ यांनी यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. रोटी डेच्या दिवशी रोटी दे असा ते प्रचार करत आहेत.

गिरगावात वास्तव्य करत असताना रुपारेल कॉलेजमध्ये ते महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. शिवाजी पार्कच्या क्रिकेट टीममध्ये ते सक्रिय असल्यामुळे शिक्षण आणि क्रिकेट यासाठी पूर्ण दिवस द्यावा लागत होता. घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे त्यावेळी एकच चपाती त्यांच्या वाट्याला येत होती दुपारपर्यंत ती संपतही होती. मग या युवावस्थेत संध्याकाळी अवघ्या एका आण्यावर दिवस काढावा लागत होता. मित्र-मंडळी कधीकधी त्यांची भूक भागवत होते. पोटभर चपाती न मिळाल्यामुळे त्यावेळची अवस्था आजही त्यांना अस्वस्थ करते. ज्यांच्याकडे पुरेसे धान्य आहे, अधिक रोटी देण्याची क्षमता आहे त्यांनी या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्यातली एक रोटी गरीब, दीनदुबळ्यांना द्यावी आणि आत्मिक आनंद मिळवावा, असे त्यांना वाटते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -