Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन Mate Gala 2023 : प्रियंका चोप्राची पती निकसोबत शानदार एन्ट्री

Mate Gala 2023 : प्रियंका चोप्राची पती निकसोबत शानदार एन्ट्री

Subscribe

‘मेट गाला 2023’ सध्या न्यूयॉर्क शहरात सुरू झाला असून अनेक दिग्गज कलाकार यामध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने देखील आपला पती निक जोनससोबत हजेरी लावली होती. या प्रसिद्ध फॅशन शोच्या रेड कार्पेटवर दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे घातले होते. सोशल मीडियावर सध्या या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jerry x Mimi 😍 (@jerryxmimi)

जगातील प्रसिद्ध असलेल्या या फॅशन शोमध्ये मेट गालाच्या थीमनुसार कपडे परिधान केले जातात. मेट गालातील यंदाची थीम कार्ल लेजरफेल्ड : ए लाइन ऑफ ब्युटी आहे.

- Advertisement -

या फॅशन शोमध्ये प्रियंका चोप्राने अनेकवेळा भाग घेतला आहे. तर अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि सोनम कपूर यांसारख्या अभिनेत्रीनींही या फॅशन शोमध्ये यापूर्वी हजेरी लावली आहे. पण यावर्षी आलिया भट्ट मेट गालामध्ये पदार्पण करत आहे. तिने पांढरा गाऊन घालून कार्यक्रमात हजेरी लावली होती.

 


- Advertisement -

हेही वाचा :

‘पोन्नियिन सेल्वन 2’ने पार केला 100 कोटीचा टप्पा

- Advertisment -