घरट्रेंडिंग'May You All Safar' यशराज मुखातेचा नवीन मॅशअप व्हिडिओ व्हायरल

‘May You All Safar’ यशराज मुखातेचा नवीन मॅशअप व्हिडिओ व्हायरल

Subscribe

यशराजच्या या मॅशअपवरही नेटकरी चांगलचे फिदा झालेत.

सध्या सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडिओचा ट्रेंड सुरू आहे. इन्स्टाग्रामवर अनेक जण रिल्सचे दिवाने आहेत. अनेक नव्या दमदार गाण्यांवर सध्या अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. असाच एक व्हिडिओ मध्यंतरी सोशल मीडियावर धुमाकूळ घातल होता तो म्हणून पावरी हो रही है.  सोशल मीडियावर आपल्या मॅशअप व्हिडिओनी नेटकऱ्यांना आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या मराठमोळा म्युझिक कंम्पोझर यशराज मुखाते पुन्हा एकदा नवा व्हिडिओ घेऊन सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहे. रसोडे मे कौन था, पावरी हो रही है आणि त्वाड्डा कुत्ता टॉमी या जबरदस्त मॅशअप नंतर यशराजने ‘मे यू ऑल सेफर’ (May You All Safar) हे नवीन मॅशअप आणले आहे. या मॅशअपवरही नेटकरी चांगलचे फिदा झालेत. (‘May You All Safar’ Yashraj Mukhate new mashup video trending on social media )

 

View this post on Instagram

 

A post shared by Yashraj Mukhate (@yashrajmukhate)

- Advertisement -

‘तुम्ही सगळे प्रवास करा. सतत भटकंती करणाऱ्यात व्यस्त असणाऱ्या लोकांना हा व्हिडिओ समर्पित’, असे म्हणत यशराजने त्याच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताच काही वेळातच व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरुन सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

- Advertisement -

May You All Safar हा नवीन व्हिडिओ देखील आधीच्या व्हिडिओ इतकाच मजेशीर आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून आतापर्यंत व्हिडिओ लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये असलेली महिला ही मला प्रवास करायला खूप आवडते असे सांगत आहे. ‘शेहेराजादे नूर पीरजादा उर्फ बाजी बॉम्बैस्टिक’ असे तिचे नाव आहे. शेहेराजादे नूर पीरजादा ही एक अभिनेत्री आणि वॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. ती या व्हिडिओत मला फिरायला खूप आवडते. आय लव्ह टू सफर मे यू ऑल शफर असे म्हणत आहे. तिचा हा ओरिजिमन व्हिडिओ फारच मजेशीर आहे. त्यावरच आपली क्रिएटिव्ही दाखवत यशराजने पुन्हा भन्नाट मॅशअप बनवले आहे.


हेही वाचा – शर्लिन चोप्राने शेअर केलेला राज कुंद्रासोबतचा फोटो पाहताच नेटकऱ्यांनी शर्लिनला फटकारले

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -