घरमनोरंजनमेरी आवाज सुनो

मेरी आवाज सुनो

Subscribe

‘मेरी आवाज सुनो’ हे काही चित्रपटाचे नाव नाही तर नाटक, चित्रपट, मालिकेमध्ये सातत्याने दिसणार्‍या लीना भागवत हिचे हे आपुलकीचे सांगणे आहे. काळ बदलला तसे तंत्र बदलले. माणसाची धावपळ वाढली. चांगले साहित्य वाचनात यावे असे वाटत असतानासुद्धा वाचकाला पुस्तक वाचण्यासाठी वेळ काही मिळत नाही. अशा जागृत वाचकांसाठी ऑडिओबुक काढण्याची प्रथा आता पुढे आली आहे. बर्‍याच वेळा नामवंत कलाकारांकडून ऑडिओ करून घेतले जाते. आता हा मान लीनालाही मिळालेला आहे. पण तिच्याबाबतीत थोडे वेगळे घडलेले आहे. ते म्हणजे जगभरातील पहिल्यावहिल्या ऑडिओबुक अ‍ॅप स्ट्रिमिंग सेवा देणार्‍या ‘स्टोरिटेल अ‍ॅप’ने हे ऑडिओबुक प्रकाशित केलेले आहे.

‘माया महा ठगनी…’ हे या ऑडिओबुकचे नाव आहे ज्याचे लेखन संवेद गळेगावकर याने केलेले आहे. ही एक थरार कथा आहे. यातल्या नायिकेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. पुरुषी वर्चस्व वाढलेले आहे. त्यात स्त्रीची मानसिक कुचंबना केली जात आहे. त्याला सामोरी जाणारी ही महिला आहे जी आवाजातून लीनाने साकार केलेली आहे. आजच्या तरुणवर्गाला नव्या प्रयत्नाबरोबर यातली कथासुद्धा आवडेल असा प्रयत्न या ऑडिओबुकमध्ये झालेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -