कदाचित त्या मला फॉलो करतात… विवाहित अभिनेत्रींबद्दल हेमा मालिनींचे वक्तव्य

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि मधुरा खासदार हेमा मालिनी अनेकदा विविध कारणामुळे चर्चेत असतात. हेमा मालिनी यांना बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून नावाजले जाते. आजही त्यांच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. दरम्यान, अशातच हेमा मालिनी एका कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी अलीकडच्या काळातील अभिनेत्रींबाबत एक वक्तव्य केलंय. हेमा मालिनींच्या मते, सध्याच्या काही अभिनेत्री मला फॉलो करतात असं म्हटलं आहे.

काय म्हणाल्या हेमा मालिनी?

Yes, I Think I'm Beautiful: Hema Malini

 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हेमा मालिनी यांना विचारण्यात आलं की, तुमच्या काळात एक वेळ अशी होती, “जेव्हा लग्नानंतर काही अभिनेत्रींचे करिअर संपायचे. पण आता या गोष्टीत बदल झाला आहे. दीपिका, आलिया, कतरिना या लग्नानंतर चित्रपटांमध्ये तितक्याच सक्रिय आहेत. त्यामुळे या बदलाबाबत तुम्ही काय सांगाल?” प्रश्नावर उत्तर देत हेमा मालिनी म्हणाल्या की, “मी या प्रश्नावर फार काही बोलणार नाही. कारण मी लग्नानंतरही माझे काम कधी सोडले नाही. माझे लग्न झाल्यानंतरही मी चित्रपटांमध्ये काम करत होते. मी कधीच थांबले नाही. कदाचित अलीकड्या अभिनेत्री मला फॉलो करत असतील.” असं त्या म्हणाल्या.

अभिनेत्रीने लग्नानंतर लवकर आई होऊ नये

पुढे हेमा मालिनी म्हणाल्या की, आताच्या अभिनेत्रीच्या पतीला देखील समजायला हवे, की ज्या मुलीसोबत आपण लग्न केलयं ती एक अभिनेत्री आहे लोकांना तिला पाहायला आवडते. त्यामुळे अभिनेत्रीने लग्नानंतर लवकर आई होऊ नये नाहीतर तिला खूप काळ ब्रेक घ्यावा लागतो. जर तुम्ही काम करायला पूर्ण तयार असाल तर त्यावेळी कोणताही ब्रेक घेण्याची चूक करु नये. कारण तुम्हाला काम करण्याची इच्छा असेल तर चित्रपटाचे निर्माते तुम्हाला मोठी रक्कम देऊन साईन करण्यास तयार आहेत.


हेही वाचा :

‘तू झूठी मैं मक्कार’ लवकरच करणार 100 कोटींचा टप्पा पार