घरताज्या घडामोडी'माझा होशील ना' नंतर अभिनेता विराजस कुलकर्णीचं दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

‘माझा होशील ना’ नंतर अभिनेता विराजस कुलकर्णीचं दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

Subscribe

'व्हिक्टोरिया' या सिनेमातून विराजस पहिल्यांदा दिग्दर्शकाची भूमिका पार पाडणार

छोट्या पडद्यावरील माझा होशील ना या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचणारा अभिनेता विराजस कुलकर्णी आता दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. ‘व्हिक्टोरिया’ या सिनेमातून विराजस पहिल्यांदा दिग्दर्शकाची भूमिका पार पाडणार आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त पार पडला. सिनेमाचे खास वैशिष्ट्य सिनेमाचे शुटींग स्कॉटलँडमध्ये होणार आहे. सिनेमात बिग बॉस फेम अभिनेता पुष्कर जोग मुख्य भूमिकेत असणार आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. तसेच अभिनेत्री हीरा सोहली या सिनेमातून पदार्पण करत आहे. विराजस कुलकर्णीसोबत अभिनेता जीत अशोक देखील दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटाची कथा , पटकथा व संवाद ओमकार गोखले , जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिली आहे.

ती आणि ती , वेल डन बेबी चित्रपटाच्या यशानंतर आनंद पंडित मोशन पि्चर्स एल एल पी आणि गुसबम्प्स एंटरटेनमेंट पुन्हा एकदा एक नवीन चित्रपट घेवून येत आहेत. आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांची निर्मिती संस्था गुसबम्पस एंटरटेनमेंटचा हा एकत्रित तिसरा मराठी चित्रपट आहे . तसेच अभिनेता पुष्कर जोग यांचा सोनाली कुलकर्णी देखील हा तिसरा चित्रपट आहे. या पूर्वी ती आणि ती, तमाशा लाईव हे दोन चित्रपट त्यांनी केले आहेत . आनंद पंडित , रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर वैशल शाह हा सह निर्माता आहेत.

- Advertisement -

विराजसला माझा होशील ना या मालिकेतून प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. आदित्य आणि सई प्रेक्षकांच्या फार कमी वेळात पसंतीस उतरले होते. मालिका संपली असली तरी सई आणि आदित्य प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.


हेही वाचा – Sam Bahadur: सॅम बहादूरमध्ये विक्कीसोबत दिसणार अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -