एमसी स्टॅनने इंस्टाग्राम लाईव्ह आणि लाईक्समध्ये शाहरुख, विराटला देखील टाकलं मागे

एमसी स्टॅन ‘बिग बॉस 16’चा विजेता झाल्यापासून येत्या दिवसात नवनवीन रेकॉर्ड्स बनवत आहे अशातच एमसी स्टॅनने आता विराट कोहली आणि शाहरुख खानचे देखील रेकॉर्ड तोडले आहेत

‘बिग बॉस 16’च्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये एमसी स्टॅन विजयी ठरला. तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या एसमी स्टॅनच्या नावाची घोषणा होताच एकच जल्लोष झाला होता. वयाच्या 23 व्या वर्षी बिग बॉसची ट्रॉफी जिंकणाऱ्या एमसी स्टॅनचे आता देशभरात अनेक चाहते आहेत. ‘बिग बॉस 16’मध्ये येण्यापूर्वी एमसी स्टॅनचे 18 लाख फॉलोवर्स होते. त्याचीच संख्या आता 9 कोटी कडे पोहोचली आहे. इतकचं नव्हे तर, एमसी स्टॅन ‘बिग बॉस 16’चा विजेता झाल्यापासून येत्या दिवसात नवनवीन रेकॉर्ड्स बनवत आहे अशातच एमसी स्टॅनने आता विराट कोहली आणि शाहरुख खानचे देखील रेकॉर्ड तोडले आहेत.

इंस्टाग्राम लाईव्हवर शाहरुखपेक्षा जास्त व्ह्यूज

नुकताच एमसी स्टॅन इंस्टाग्रामवर 10 मिनिटांसाठी लाईव्ह आला होता. या 10 मिनिटांमध्ये एमसी स्टॅनला पाहण्यासाठी 541 हजार लोक इंस्टाग्राम लाईव्हवर होते. म्हणजेच एमसी स्टॅनला 541 हजार व्ह्यूज मिळाले. आत्तापर्यंत कोणात्याच भारतीय कलाकाराला लाईव्ह आल्यावर इतके व्ह्यूज मिळाले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, याआधी हा रेकॉर्ड शाहरुख खानच्या नावावर होता. त्याला इंस्टाग्राम लाईव्हवर 255 हजार व्ह्यूज मिळाले होते.

इंस्टाग्राम लाईक्समध्ये विराटला टाकलं मागे

ज्या दिवशी एमसी स्टॅन‘बिग बॉस 16’चा विजेता झाला. त्याचं दिवशी एमसी स्टॅन आणि विराट कोहली यांनी सोशल मीडियावर दोन वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या होत्या. यात एमसी स्टॅनने बिग बॉसच्या ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर केला होता तर विराट कोहलीने भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तान संघाविरुद्ध मिळवलेल्या यशाचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली होती. विराट कोहली इंस्टाग्रामवर भारतातील सर्वात जास्त फॉलोअर्स असणारा व्यक्ती आहे. त्यामुळे त्याच्या पोस्टला नेहमीच सर्वाधिक लाईक आणि कमेंट्स असतात मात्र, यावेळी विराटच्या पोस्टला 20 लाख लाईक्स होते तर एमसी स्टॅनला 69 लाख लाईक्स होते.

 


हेही वाचा : 

स्वरा भास्करने दिला सुखद धक्का; सपा नेत्यासोबत थाटला संसार